राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सांचोरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल यात शंका नाही. हो कारण एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने एक दोन नव्हे तर तब्बल ५६ ब्लेड गिळले आहेत. शिवाय मुलाला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, ब्लेड गिळलेल्या तरुणाचं नाव यशपाल सिंग असं आहे. यशपालने ब्लेड गिळल्यामुळे त्याच्या गळ्यावर गंभीर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. शिवाय पोटात ब्लेड गेल्यामुळे संपूर्ण अंगावर सूज आली होती. शिवाय शरीराच्या आतमधील भागात गंभीर जखमाही झाल्या होत्या. या तरुणाच्या शरीरातील ब्लेड काढण्यासाठी सात डॉक्टरांच्या पथकाने तब्बल ३ तास शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याचे प्राण बचावले.

हेही पाहा- वंदे भारत एक्सप्रेस उंच घाटात पोहोचताच…, महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा थरारक Video पाहाच

तरुणाच्या मित्रांनी यशपालला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, डॉ.नरसी राम देवासी यांनी प्रथम यशपालचा एक्स-रे काढला आणि नंतर सोनोग्राफी केली असता त्याच्या पोटात अनेक ब्लेड असल्याचं त्यांना दिसलं. पण ती ब्लेडच आहेत का याची खात्री करण्यासाठी पुन्हा एंडोस्कोपी केली. त्यानंतर पोटातील ब्लेड काढण्यासाठी आपत्कालीन ऑपरेशन करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला रुग्णालयात आणले तेव्हा त्याची ऑक्सिजनची पातळी ८० होती. त्यानंतर त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया केली आणि त्यातून ५६ ब्लेड काढली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

हेही पाहा- धावत्या कारमधून नोटांचा पाऊस; भररस्त्यावर पैसे फेकणाऱ्या तरुणाचा Video पाहून व्हाल थक्क

डॉ. नरसी राम देवासी यांनी सांगितले की, यशपालने कव्हरसह ब्लेडचे ३ पॅकेट गिळले होते. शिवाय त्याने हे कृत्य चिंता किंवा नैराश्यातून केल्याची शक्यता आहे. यशपालने ब्लेडचे २ भाग करुन ती कव्हरसह खाल्ली, ज्यामुळे ती त्याच्या शरीरात गेली. त्याने जर ब्लेड न मोडता खाल्ले असते तर ते घशातच अडकले असते, आत गेलेच नसते असंही डॉक्टर म्हणाले. शिवाय यशपालच्या पोटात ब्लेड गेले तेव्हा त्यावरील आवरण विरघळले आणि पोटाच्या आत उघड्या ब्लेडमुळे त्याच्या पोटातील काही भाग कापला गेला. ज्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला आणि तरुणाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. शस्त्रक्रियेनंतर ब्लेड काढले असून त्याच्या पोटातील जखमेवरही उपचार करण्यात आल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 years old youth rajasthan man swallows 56 blades doctor operates metals in bizarre incident jap