Andra Pradesh News: वयाची पन्नाशी पूर्ण झाल्यास हृदयविकार जडतो. काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्यांचे वय साधारण पन्नाशी पार असत. मात्र, अलीकडे बदलती जीवनशैली, धावपळीचे युग आणि त्यामुळे होणारा ताणतणाव या कारणांनी आता वयाच्या पंचविशीतही हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो. दरम्यान इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे गणेशोत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण मंडपात नाचताना हार्ट अटॅक असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणाचं नाव प्रसाद असं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील धर्मावरम शहरात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मावरम येथील गणेश मंडपात नाचताना तरुण अचानक कोसळला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणेशोत्सवादरम्यान नाचत असताना ही घटना घडली. प्रसाद असं मृत्य तरूणाचे नाव आहे. अचनाक ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याता मृत्यू झाला.उपस्थित नागरिकांनी त्याल लगेच रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ही रांग iPhone 15 घेण्यासाठीची नाही! एकवेळच्या अन्नासाठी आहे; Video पाहून मन अक्षरशः भरून येईल

सध्या हृदयविकाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चालता बोलता एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात आपल्यातून निघून जात आहे. अनेकांचा जीममध्ये व्यायाम करताना देखील अनेकांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. नाचता नाचताही अनेकांचा जीव गेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 year old boy dies of heart attack while dancing at ganesh pandal viral video on social media srk