काहीजण स्वप्न बघतात त्याचा विचार करतात आणि सोडून देतात, परंतु काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात जे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग ते इतर गोष्टींचा विचार नाही करत. अशावेळी कितीही आव्हान आली तरीही त्या सगळ्यांचा सामना करून अतिशय धाडसाने आणि पॅशनेटली आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागतात. मात्र कधी कधी सर्व मिळूनही मन समाधानी नसतं. कोणता प्रसंग कधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देतो आणि त्यापासून कशाची प्रेरणा मिळते ते काळच ठरवत असतो..
कॉर्पोरेट कल्चरला कंटाळून सोडली नोकरी
मित्रांनो तुम्ही अभिनेता सलमान खान याचा काही वर्षांपूर्वी आलेला ‘किक’ हा सिनेमा नक्कीच पाहिला असेल ज्यात तो सतत “वो काम मै नाही करता जिसमे मुझे किक नाही मिलती” असे म्हणताना दाखवला आहे. मित्रांनो अशाच एका व्यक्तीने किक मिळत नाही म्हणून नोकरी सोडून दिली आहे. कॉर्पोरेट कल्चरला तो इतका कंटाळला होता की त्यानं नोकरीवर पाणी टाकलं, मात्र यानंतर त्याच्याकडे पैशाची कमी निर्माण झाली आणि तो टेंटमध्ये राहू रागला.
चांगल्या पगाराची नोकरी सोडली आता तंबूमध्ये राहतोय
हे संपूर्ण प्रकरण चीनच्या सिचुआन प्रांतातील आहे. ली शू नावाच्या या व्यक्तीने २०१८ मध्ये आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये आरामात वेळ घालवू लागला. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की पैसे न कमावता खर्च केल्यास त्याची बचत संपेल. तेव्हापासून त्याने दैनंदिन खर्चात कपात करण्यास सुरुवात केली. फक्त १२० रुपयांत संपूर्ण दिवस घालवायला सुरुवात केली. तरीही घरभाडे भरण्यासाठी पैशांची गरज होती, म्हणून त्याने आपलं सर्व सामान विकलं. यातून त्याला पाच हजार रुपये मिळाले, त्याचा तंबू विकत घेऊन तो पार्कमध्ये राहू लागला. मागच्या २०० दिवसांपासून तो पार्कमध्ये राहतोय, पण त्याला पुन्हा काही कॉर्पोरेटमध्ये काम करायचं नाही.
हेही वाचा – Video: ट्रॅक्टरवर स्टंट करणं बेतलं जिवावर, पुढच्याच क्षणी तरुणाचं डोक चाकाखाली अन्…
दरम्यान या तरुणाला आता स्वत:साठी जगायचं आहे. अशातच जरी त्याने नुकतीच सुरुवात केली असली आणि अद्याप त्याच्याकडे उत्पन्नाचा “विश्वसनीय” प्रवाह नसला तरीही, सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा त्याचा खूप सकारात्मक दृष्टीकोन आहे.