Horrifying Bike Accident Video : गाड्या सावकाश चालवा, असे अनेकदा सांगूनही काही अतिउत्साही चालक आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अपघातांच्या घटना घडतात. रस्ते अपघाताचे अनेक नवनवे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. त्यातील काही अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे झालेले असतात; तर काही अपघात समोरच्या वाहनाच्या चुकीने घडलेले असतात. असाच एका भीषण अपघाताचा लाइव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा अक्षरश: येईल. हा व्हिडीओ विशेषत: बाईक चालविताना वेगावर नियंत्रण नसेल, तर काय होऊ शकते? हे सांगणारा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. या भीषण अपघातात बाईकच्या वेगावर नियंत्रण नसल्याने तीनपैकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत आहे. दरम्यान, रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर या तरुणांच्या मदतीसाठी कोणीही धावून आल्याचे दिसले नाही.

हा भीषण अपघात विशाखापट्टणम एडी उड्डाणपुलावर झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी ड्युक बाईक दुभाजकावर धडकल्याने अपघाताची ही घटना घडली. त्यानंतर बाईक उलटी होऊन, तीनही तरुण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले. मन सुन्न करणारी अशी ही दुर्घटना आहे. अपघाताच्या लाइव्ह व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वाहनही नजरेस न दिसणारा
अतिशय सामसूम असा उड्डाणपूल दिसतोय. त्याच वेळी अतिशय भरधाव वेगात एक बाईक आली; ज्यावर तीन तरुण बसले होते. ही बाईक जोरात जाऊन उड्डाणपुलाच्या भिंतीवर धडकली; ज्यामुळे बाईकवर बसलेले तिघेही जोरदारपणे उडून थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळले. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात

हा अपघात उड्डाणपुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानुसार बाईक उड्डाणपुलावरून भरधाव जात असताना दुभाजकाला धडकते आणि त्यावरील तिघेही तरुण खाली पडल्याचे दिसून येत आहे.

आई झाली कसाई! चिमुकलीला पलीत्याने चोपलं, गळा दाबला मग फरपटत नेत…; अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल

या दुर्घटनेने अतिवेगाने वाहन चालविण्याचे धोके पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत. विशेषत: उड्डाणपुलांवर वेगमर्यादा पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण- तिथे छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. हा व्हिडीओ @TeluguScribe नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; जो आता खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा अतिशय भीषण असा अपघात असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी, पालकांनी मुलांना महागड्या बाईक घेऊन देऊ नका, असा सल्ला दिला आहे.

Story img Loader