Horrifying Bike Accident Video : गाड्या सावकाश चालवा, असे अनेकदा सांगूनही काही अतिउत्साही चालक आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अपघातांच्या घटना घडतात. रस्ते अपघाताचे अनेक नवनवे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. त्यातील काही अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे झालेले असतात; तर काही अपघात समोरच्या वाहनाच्या चुकीने घडलेले असतात. असाच एका भीषण अपघाताचा लाइव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा अक्षरश: येईल. हा व्हिडीओ विशेषत: बाईक चालविताना वेगावर नियंत्रण नसेल, तर काय होऊ शकते? हे सांगणारा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. या भीषण अपघातात बाईकच्या वेगावर नियंत्रण नसल्याने तीनपैकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत आहे. दरम्यान, रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर या तरुणांच्या मदतीसाठी कोणीही धावून आल्याचे दिसले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा