Dog and Snake Viral Video News : साप प्रचंड विषारी प्राणी आहे. सापाचं विष माणसांसहित प्राण्यांनाही माणसांनाही अत्यंत घातक आहे. यामुळे प्राणी किंवा माणसं विषारी सापापासून दूरच राहतात. सापांवर प्रेम करणारे क्वचित माणसं आढळून येतील. मुंगूस प्राणी सोडला तर कोणत्याही प्राण्याची सापासोबत क्वचित झुंज पाहिली असेल. मात्र, सोशल मीडियावर पाळीव कुत्र्याचा आणि विषारी सापाच्या जीवघेणी झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या कुत्र्यांच्या झुंडीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांनी झाडामध्ये लपलेल्या एका सापाला मृत्यूमुखी पाडलं आहे. तर ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुत्र्यांनी या हल्ल्यातून एकीचे दर्शन घडवून दिलं आहे.
नेमकं काय घडलं ?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, झाडीतून लपलेल्या सापाला कुत्रे बाहेर काढतात. तोंडात दाबून त्याला खाली फेकतात. तीन मोठे कुत्रे सापांशी भिडत असून लहान कुत्रेही तिथे मधे मधे करताना दिसत आहेत. साप तिन्ही कुत्र्यांना न घाबरता त्यांच्याशी झुंज करु लागतो. सापही कुत्र्यांवर हल्ला करतो. कुत्रे घेरून सापाला ठार करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी कुत्रे सापाला मात देण्यात यशस्वी होतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Optical Illusion: फोटोत लपलेला ‘L’ शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे आहे ८ सेकंदाची वेळ
दरम्यान, अनेक कुत्रे हे सापापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांना पाळीव कुत्र्याची भयानक झुंज पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे. हा विषारी साप कुत्र्याला चावला असता तर पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला असता. मात्र, तसे होण्याआधीच कुत्र्याने सापाचा जीव घेतला. या दोन्ही प्राण्याच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.