आपल्याला आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत आपला वाढदिवस साजरा यावा असे नेहमी वाटत असते. अशाच तीन मैत्रिणींनी त्यांचा १०० वा वाढदिवस एकत्र साजरा केला. हा वाढदिवस खास ठरला कारण तिघींचा वाढदिवस एकाच आठवड्यात होता आणि त्यांनी करोना लस घेऊनच नंतर वाढदिवस साजरा केला. १०० वर्षांच्या झालेल्या या तीन महिलांनी मॅनहॅटनच्या अप्पर वेस्ट साइडमधील अट्रिया सीनियर लिव्हिंग कम्युनिटीमध्ये जूनमध्ये आपल्या घरी हा खास दिवस साजरा केला. करोनाच्या निर्बंधांमुळे ह्या तीन मैत्रिणी खूप दिवसांनी खास आपल्या वाढदिवसा दिवशी भेटल्या यामुळे त्यांना खूप आंनद झाल्याचही त्या सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ जूनला साजरा केला वाढदिवस

१०० वर्षाच्या रूथ श्वार्ट्ज यांनी सांगितले की, “मला वाटतं की माझा जन्म लकी स्टार खाली झाला आहे. आम्हा तिघांना आमचा वाढदिवस एकत्र साजरा करता आला. इथे लस घेण्याबद्दल आभारी आहे.” ८ जून रोजी झालेल्या पार्टीत आता संपूर्ण लसीकरण झालेल्या रूथ श्वार्ट्ज, एडिथ “मिट्झी” मॉस्को आणि  लॉरेन पिररेलो यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह जवळच्या मित्रांसमवेत पुन्हा एकत्र भेटले. “जेव्हा आम्ही इतके महिने लॉकडाउनमध्ये होते तेव्हा खरोखर भयानक पारस्थिती होती, परंतु हे आवश्यक होते” असे लॉरेन पिररेलो यांनी लोकांना सांगितले. लॉरेन पिररेलो न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन ऑपेरा समूहात मेझो सोप्रानो म्हणून २० वर्षानंतर निवृत्त झाले.

मला जिवंत आहे असं वाटलं – लॉरेन

१८ जून रोजी लोरेनने रुथच्या वाढदिवशी एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांच्या ग्रुपला भेट दिली. त्या म्हणतात, “मला आता खूप मोकळे वाटले आहे. मी जिवंत आहे असे मला वाटते.” खरं तर  रूथसाठी  हा एक भावनिक क्षण होता जेव्हा त्यांनी पहिल्यांदा कॅलिफोर्नियामधील त्यांच्या २ वर्षाच्या मोठ्या नातवंडाला भेटल्या. रूथ सांगतात ” माझा नातू माझासोबत प्रत्यक्षात उभा होता हे पाहून मला खूप आनंद झाला.”

ब्रूकलिनमधील एडिथ मॉस्को यांनी सांगितले की त्या संग्रहालये आणि कॉसर्टला भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना त्यांच्या मैत्रीणीना भेटून खूप आनंद झाला.