जंगलात अनेक प्रकारचे प्राणी राहतात, परंतु त्यापैकी फक्त काही प्राणी असे आहेत, जे खूप धोकादायक आहेत. ज्यांच्यापासून दूर राहणं चांगलं, अन्यथा त्यांच्या तावडीत अडकल्यानंतर जीव वाचवणं कठीण होतं. वाघ या धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. सिंहानंतर सर्वात धोकादायक वन्य प्राणी कोणता असेल तर तो वाघ आहे. वाघाच्या तावडीत सापडणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालणं. याच कारणामुळे बहुतेक प्राणी वाघापासून दूर राहण्यातच भलं समजतात. मात्र, अनेकदा आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्यांच्यावर विश्वास बसत नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तिन वाघांच्या तावडीत एक व्यक्ती सापडला आहे. हे वाघ या तरुणासोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे वाघ तरुणाच्या अंगावर उड्या मारत आहेत मात्र वाघाचं वजन जास्त असल्यामुळे हा तरुण पुरता घाबरला आहे. हे तिन्ही वाघ सुरुवातीला त्याच्या अंगावर जात आहेत. मात्र हा तरुण वारंवार वाघांना आपल्यापासून लांब करत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे हा तरुण वाघांच्या पिंजऱ्यात अडकला आहे. सुरुवातील मजेदार वाटणारं दृश्य नंतप भितीदायक वाटत आहे. या तरुणावर वाघांनी खरचं हल्ला केला तर असे प्रश्न व्हिडीओ बघून पडत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – एवढी सहनशक्ती फक्त वडिलांमध्येच! आई असती तर…बाप-लेकीचा मजेदार Video तुफान व्हायरल
या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं, हे पाहून मला खरंच भीती वाटत आहे.इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ unfomate नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले आहेत.