लहान मुलांना सांभळणे हे वाटते तितके सोपे काम नाही. जरा नजर हटली की मुलं काही ना काही उद्योग करून ठेवतात. कित्येकदा मुलं अशामुळे स्वत:ला संकटात टाकतात. त्यामुळे पालकांना मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. सध्या असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका ३ वर्षीय मुलांने चूकून स्वत:ला लॉक केले त्यानंतर मुलाला कारमधून बाहेर काढण्यासाठी वडिलांनी प्रसंगावधान दाखवले आणि त्याचा जीव वाचवला. दरम्यान आपल्या मुलांबरोबर घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि अशा स्थितीमध्ये याबाबत सर्व पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

३ वर्षाच्या मुलाने स्वत:ला कारमध्ये केले लॉक

सुंदरदीप सिंग ट्विटरवर त्यांच्या एका मुलाने स्वत:ला कारमध्ये कसे लॉक केले याबाबत सांगितले आहे. लुधियाना येथे सिंग हे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेले असताना हा प्रसंग घडला. त्यांची पत्नी आणि एक मुलगा शाळेतच होते आणि सिंग यांनी त्यांचा दुसरा ३ वर्षाचा मुलगा कबीरला कारच्या मागच्या बॅगसह बसवले त्याचवेळी कबीरने वडिलांच्या हातातून चावी हिसकावून घेतली. सिंग यांनी मागचा दरवाजा बंद केला आणि पुढच्या दरवज्यातून कारच्या दरवाजाने आतमध्ये जाणार होते नेमके कबीरने लॉक बटन दाबले आणि त्याने स्वत:ला कॉलमध्ये लॉक केले.

हेही वाचा – Optical Illusion : ‘या’ फोटोत खरचं एक मांजर आहे, पण कुठे? तेच तर शोधयाचे तेही फक्त १० सेंकदात!

वडिलांनी दाखवले प्रसंगावधान

सिंग यांच्या लक्षात आले की ही आपत्कालीन परिस्थिती आहे. त्यांनी आत असलेल्या कबीरला कार अनलॉक करण्यास सांगण्याचा प्रयत्न केला पण तोही घाबरला होता. त्याने घाबरून लॉक बटण दाबत राहिला त्यामुळे थेफ्ट अलार्म सुरू झाला आणि तो आणखीच घाबरला अन् रडू लागला. हे सर्व पाहून काही लोक आणि शाळेचे कर्मचारी तेथे आले आणि सिंग यांना मदत करण्याचा प्रयत्न करू लागले.

सिंग यांनी तात्काळ स्थानिक कार डिलरला कॉल करून बोलवले. ते तात्काळ मदतीसाठी निघाले तरी त्यांना पोहचायला ३०-४० मिनिट लागणार होते. म्हणून त्यांनी त्यांच्या भावाला दुसरी चावी घेऊ येण्यास सांगितले पण त्यालाही कमीत कमी १५ मिनिटे लागणार होते.

कारची काच तोडून काढले बाहेर

गाडी आतून गरम असल्याने सिंग यांच्या मनात सर्व वाईट विचार येते होते. त्यांच्या लक्षात आले की जवळच एक मेकॅनिकचे दुकान आहे. ते पळत तिथे पोहलचे आणि त्याला सर्वात मोठा स्लेजहॅमर आणण्यास सांगितले आणि त्याने त्या मेकॅनिकला कारची मागची काच फोडायला सांगितली. पंक्चर दुरुस्त करणाऱ्या माणसाने त्याऐवजी क्वार्टर काचेवर आपटले आणि तीन-चार प्रयत्नांनंतर ती सुटली. त्या मुलाने तुटलेल्या काचेतून स्वतःला न दुखापत न होऊ देता कारची चावी वडिलांकडे सोपवली. सिंग यांच्या सर्व प्रयत्नांमुळे त्यांच्या मुलाचा जीव वाचला.

हेही वाचा- भरपावसात गजबजलेल्या रस्त्यावर इन्फ्लुएन्सरने केला डान्स, व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

घडल्या प्रसंगातून सिंग यांनी धडा घेतला आणि अशा स्थितीत काय करावे याबाबत इतर पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

  • १) सिंग यांनी जेव्हा चावीचे कव्हर काढले कारण त्यामुळे बटन दाबणे कठीण झाले आहे. कबीर आतून लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असेल पण ते दाबले जात नव्हते.
  • २) काहीही झाले तरी कारची एक खिडकी दोन इंच खाली उघडून ठेवेन, .
  • ३) विटेने काच फोडण्याचा प्रयत्न करून वेळ वाया घालवू नका.
  • ४) मुलाच्या हातात कधीही चाव्या देऊ नका. सिंग यांनी कबूल केले की ही त्यांची सर्वात मोठी चूक होती. ही एक सामान्य गोष्ट आहे या दृष्टिकोनामुळे ही परिस्थिती उद्भवली. या खोडकरांना मुलांना त्यांच्या चाइल्ड सीट बेल्ट लावून ठेवा, रडत असले तरी.
  • ५) दुसरी कार चावी लॉकर किंवा सेफमध्ये ठेवण्याऐवजी नेहमी पटकन मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
  • ६) कारमध्ये एकत्र बसा.कधीही मुलांना एकट्याला आधी आत बसवू नका.
  • ७) आपल्या आजूबाजूच्या, मेकॅनिक, लोहार बद्दल कुठे आहेत याबाबत नेहमी जागरूक रहा. तुमच्या कारच्या ब्रँडचा रोड साइड असिस्टन्स नंबर नेहमी जवळ ठेवा.

सिंग यांनी पंचर शॉप मेकॅनिक आणि हॉगवॉर्टच्या कॅसलच्या कर्मचार्‍यांचे आभार देखील व्यक्ती केले.

हेही वाचा – धनलाभ झाल्यानंतर करू नका ‘या’ चुका अन्यथा…. जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

“मला वाटतं की मला विंडो व्हिझर्स घेण्याची वेळ आली आहे, ते दिसालाय विचित्र दिसते, पण जर खिडक्या एका इंचापर्यंतही हवा जाण्यासाठी खाली ठेवायची असेल तर ते खरोखर फायदेशीर आहे,” असे एकाने कमेंटमध्ये लिहिले. “तो सुरक्षित आहे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे . लहान मुले कारमध्ये एकटे असतील तर सुरक्षेसाठी तुम्ही अर्धे सनरूफ देखील उघडे ठेवू शकता जे असे क्षण टाळता येतील., असे दुसऱ्याने सांगितले. “बापरे हे सर्व भयानक होते.. आणि होय आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे.. मी हे देखील आजपासून लक्षात ठेवेन,”असे तिसऱ्याने लिहिले.

Story img Loader