टेस्ला ही कार अद्वितीय तंत्रज्ञान आणि शोधांसाठी लोकप्रिय आहे. यामुळेच जगभरात टेस्लाची इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यात दिसत आहे. पण ती कार विकत घेणे प्रत्येकाच्याच जिकिरीचे नाही. कारण कारची किंमत आणि तिच्या देखभालीचा खर्च सर्वांनाच परवडणारा नाही. मात्र, फिनलंडमधील एक व्यक्ती या कार कंपनीच्या सेवेमुळे इतका निराश झाला की त्याने आपली सेडान टेस्ला मॉडेल एस ३० किलो डायनामाइटने उडवली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

२०१३ टेस्ला मॉडेल एस या कारचे मालक टुमास काटेनेनने त्याच्या मौल्यवान कारला जे काही केले ते मनोरंजनासाठी नव्हते तर EV (इलेक्ट्रिक वाहन) कंपनीच्या सेवेमुळे निराश झाले होते. खरं तर, ट्यूमासला त्याच्या टेस्ला सेडानचा चांगला अनुभव मिळाल्यानंतर त्याच्या कारमध्ये खूप समस्या येऊ लागल्या. त्यामुळे जेव्हा त्याची कार टेस्ला सर्व्हिस सेंटरमध्ये आली तेव्हा त्याचा अनुभव इतका दुःखद असेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.

(हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)

कार दुरुस्तीचा खर्च लाखात

कार सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यानंतर एक महिन्यानंतर, कंपनीला धक्का बसला जेव्हा टुमासला माहिती मिळाली की त्यांच्या सेडान कारची सर्व बॅटरी बदलल्याशिवाय दुरुस्त केली जाणार नाही आणि त्याची किंमत डॉलर २२,४८० (रु. १७ लाखांपेक्षा जास्त) आहे. कारण कार ८ वर्षे जुनी होती आणि ती वॉरंटी सुद्धा नव्हती. त्यामुळे बॅटरी बदलण्याव्यतिरिक्त, कारसाठी इतर खर्च जोडणे आवश्यक होते, त्यामुळे निराश होऊन टेस्ला कार मालकाने ३० किलो गनपावडरने कार उडवण्याचा निर्णय घेतला.

(हे ही वाचा: जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का?)

( हे ही वाचा: टीव्हीवर मांजरीने पक्षी पाहिल्यावर शिकारीसाठी मारली उडी, आणि…बघा Viral Video)

व्हिडीओला ३.३० लाख व्ह्यूज

हा व्हिडीओ १७ डिसेंबर रोजी यूट्यूब चॅनल Pommijätkät वरून शेअर करण्यात आला होता, ज्याला ३ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ६.५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय युजर्सनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 kg dynamite blown car as person was not satisfied with teslas service video viral of the incident ttg