King Cobra Video: तुम्ही तुमच्या पार्किंगच्या जागेत कार पार्क केल्यानंतर घरी येता आणि जेव्हाही तुम्ही गाडी काढायला जाता तेव्हा तुम्ही ती सुरू करून निघून जाता, पण पुढच्या वेळी तुम्ही जर असं करत असाल तर थोडं सावध व्हा. केरळमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आल्याने आम्ही हे सांगत आहोत. केरळमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारच्या आतून अचानक एक महाकाय किंग कोब्रा दिसला, त्याला असं अचानक कारमध्ये बसलेला पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला.

कारच्या आतून किंग कोब्रा निघाला

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तासांहून अधिक प्रयत्नांनंतर किंग कोब्राला पकडून ताब्यात घेण्यात आले. केरळ मधील वन व्यवस्थापन पथकाच्या नेतृत्वाखाली साप पकडणाऱ्या मोहम्मद अली यांनी किंग कोब्राला पकडले. किंग कोब्राचे वजन सुमारे ३० किलो असून त्याचे वय सुमारे १० वर्षे असल्याचे दिसते. ज्या गाडीत कोब्रा बसला होता ती कार गेल्या दोन दिवसांपासून वापरात नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कारमधून विचित्र आवाज ऐकून कार मालकाने वाहनाची तपासणी केली. यानंतर त्यांनी किंग कोब्राला पाहिले आणि लगेचच वनविभागाला माहिती दिली.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

(हे ही वाचा: किराणा दुकानात २ उंदरांची तुफान मारामारी; कधीही पाहिला नसेल असा Viral Video)

सापाला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक आले

कार मालकाने कोब्राला बाहेर काढण्यासाठी कारचा दरवाजा उघडला, पण काही उपयोग झाला नाही. काही वेळातच वनविभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी क्रॉलरच्या मदतीने कार उघडली आणि कोब्राला बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. गाडीतून अचानक एक महाकाय साप बाहेर येईल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Story img Loader