30,000 Years Old Squirrel Photos: युकॉन बेरिंगिया इंटरप्रिटिव्ह सेंटरच्या माहितीनुसार, युकॉनच्या डॉसन शहराजवळील क्लोंडाइक भागातील सोन्याच्या खाणीत 2018 मध्ये एका कामगाराला रहस्यमयी ‘फर बॉल’ सापडला होता. युकॉन सरकारचे जीवाश्मशास्त्रज्ञ ग्रँट झाझुला यांनी सीबीसीला याची माहिती देत सांगितले की, “नेमका हा प्रकार काय आहे हे आधी लक्षात येत नव्हते पण नंतर या बॉलला छोटे हात, पंजे, शेपूट व कान असल्याचे लक्षात आले, तेव्हा हा तपास सुरु झाला. “
पुढील तपासासाठी पशुवैद्य जेस हिथ यांनी या फर बॉलला एक्सरे स्कॅन केले ज्यामुळे हा नुसत्या केसांचा गोळा आर्क्टिक ग्राउंड स्क्विरल म्हणजे खारुताई असल्याचे दिसून आले. हेथने सीबीसीला सांगितले की, “खारीच्या मृत्यूपूर्वी ती उत्तम स्थितीत होती आणि तिने स्वतःला झोपेत गुंडाळून घेतले होते. आता हा प्रकार सापडला तेव्हा तपकिरी रंगाच्या दगडासारखा वाटत होता पण हातात घेतल्यावर ही मऊ व केसाळ खार असल्याचे लक्षात आले. ही खार ज्या भागात सापडली ते क्षेत्र, हिमयुगापासून गोठलेल्या मातीने झाकलेले आहे तेव्हाच या खारीचा मृत्यू झाला असावा.”
यापूर्वी याच सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्यांना लांडग्याच्या पिल्लाचे अवशेष आढळले होते. कार्बनडाय ऑक्साईड आणि मिथेन सारख्या उष्णतेला वाढवणाऱ्या वायूंच्या मानवी उत्सर्जनामुळे जागतिक तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे जमिनीची अधिकाधिक धूप होऊन असे शोध वारंवार समोर येत आहेत.
ही खार ट्रोंडेक ह्वेचिन या पारंपारिक प्रदेशात सापडली. ही आर्क्टिक ग्राउंड खारीची प्रजाती आहे जी आजही संपूर्ण युकॉनमध्ये आढळून येते. आर्क्टिक ग्राउंड खरी त्यांच्या स्वसंरक्षणसाठी जमिनीच्या आत खणून घरटे बनवतात. यापैकी बरीच घरटी हिमयुगापासून जतन केली गेली आहेत आणि ती युकॉनमध्ये सामान्य आहेत.
हे ही वाचा<< भारतीय रेल्वेच्या तिकिटावर तुम्हालाही मिळू शकते ५० ते ७५ टक्के सूट! निवांत झोपून प्रवासासाठी ‘हा’ तक्ता पाहा
अभ्यासक सांगतात की, “जेव्हा तुम्ही एखादा प्राणी पाहता ज्याने तब्बल ३०,००० वर्षे स्वतःचे जतन केलेले असते. त्याचा चेहरा, त्याची त्वचा, केस आणि ते सर्व पाहू शकता, तेव्हा स्तब्ध व्हायला होते.”युकॉन बेरिंगिया इंटरप्रिटिव्ह सेंटरने या खारीचा फोटो आणि त्याचे एक्स-रे फेसबुकवर पोस्ट केले आहेत.