एका उद्योजकाने मुंबई विमानतळ टर्मिनलमधील एका दुकानात पाणीपुरीची प्लेट ₹ ३३३ रुपयांना विकली जात असल्याचे पाहून धक्का बसला. सोशल मीडियावर डिस्पे बोर्डचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “CSIA मुंबई विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी रिअल इस्टेट महाग आहे. परंतु मला हे इतके महाग असेल हे माहित नव्हते,” असे शुगर कॉस्मेटिक्सचे सह-संस्थापक आणि सीओओ कौशिक मुखर्जी यांनी सोमवारी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तीन लोकप्रिय चाटच्या पदार्थ दिसत आहेत; ज्यामध्ये “पाणीपुरी, दही पुरी आणि शेव पुरी याचा समावेश आहे. प्रत्येक प्लेटमध्ये प्रत्येकी आठ पुऱ्या दिसत आहे. तिन्ही चाटची एका प्लेटची किंमत ३३३रुपये इतकी होती.

हेही वाचा – खेळता खेळता मांजरीने चुकून मालकाच्या घराला लावली आग! ११ लाखांचे सामान जळून खाक

X वर कौशिक मुखर्जी यांची पोस्ट येथे पहा:
मुखर्जीची पोस्ट अनेक एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यांसह प्रतिध्वनित झाली ज्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि चाट (भारतीय स्ट्रीट फूड) च्या उच्च किंमतीबद्दल शोक व्यक्त केला. एक्स युजर किंजल ठक्करने सांगितले की, “मला अमीर खान स्टारर “3 इडियट्स” मधील डॉयलॉगची आठवण झाली.

“पनीर तो कुछ दिनो बाद सोनार की दुकन पे मिलेगा इट्टी इट्टी ठेलियो में (काही दिवसांत पनीर सोनारांकडे छोट्या पॅकेट्समध्ये विकले जाईल,)” हा संवाद त्या चित्रपटात पनीरचे भाव ऐकून वापरला होता. आता पाणीपुरीवरही हीच वेळ आली आहे असे सुचवायचे आहे.

विमानतळावरील खाद्यपदार्थ जास्त किमती असतात त्यामुळे अनेकदा प्रवाशांना जेवणाचे मर्यादित पर्याय उरतात.

गेल्या वर्षी, मुंबई विमानतळावरील एक रेस्टॉरंट ₹ ६०० ते ₹ ६२० च्या किमतीत डोसा आणि ताक विकण्यासाठी X वर चर्चेचा मुद्दा होता. ग्राहकाला कॉफी जोडायची असल्यास किंमत वाढते.

त्याआधी वर्षभरापूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन समोसे, एक कप चहा आणि पाण्याची बाटली यासाठी ₹४९० द्यावे लागल्यीच पोस्ट एका पत्रकाराने शेअर केली होती ज्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती.

हेही वाचा – हद्दच झाली राव! पार्सल परत करण्याच्या नादात चुकून मांजरीलाच बॉक्समध्ये केले पॅक, ६ दिवस अन्न-पाण्याशिवाय….

“मुंबई विमानतळावर ₹४९० मध्ये दोन समोसे, एक चहा आणि एक पाण्याची बाटली. खूप चांगले दिवस आले आहेत. ” असे एक्स यूजर फराह खान यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

अनेक विमानतळावर वापरणारे प्रवासी त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड लाउंज प्रवेशाचा भाग म्हणून नाममात्र शुल्क भरून विमानतळावरील लाउंज वापरण्यास प्राधान्य देतात जेथे सामान्यतः भव्य बुफे स्प्रेड दिले जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 333 for pani puri at mumbai airport entrepreneurs post reminds x user of 3 idiots dialogue snk