Mother’s Boyfriend Pushes Daughter From Bridge: आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका १३ वर्षीय मुलीला आई व बहिणीसह, आईच्याच लिव्ह-इन पार्टनरने गोदावरी नदीच्या पुलावरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही १३ वर्षीय मुलगी बराच वेळ पुलाच्या प्लॅस्टिकच्या पाईपला लटकून जीव मुठीत धरून राहिली होती. शेवटी तिने ज्या हुशारीने आपला जीव वाचवला त्यामुळेच हे प्रकरण चर्चेत आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कीर्तना ही १३ वर्षीय मुलगी रविवारी पहाटे तिची आई पुप्पला सुहासिनी (३६) आणि बहीण जर्सी (१) व आईचा बॉयफ्रेंड उल्वा सुरेश यांच्यासह गोदावरी नदीच्या वरील पुलावर गेली होती. सुरेशने कीर्तना, सुहासिनी व जर्सी तिघींना नदीवरील ‘रावुलापलेम गौतमी’ या पुलावरून खाली ढकलले. अचानक ढकलल्यानंतर सुहासिनी व जर्सी नदीत पडल्या पण कीर्तनाने हुशारीने पुलाच्या शेजारी असलेल्या प्लॅस्टिक केबल पाईप धरला. बराच वेळ पाईपला लटकत असताना तिने खिशातून मोबाईल काढला आणि पोलिसांचा हेल्पलाईन (100) नंबर डायल केला.
रावुलापलेम पोलिसांनी सांगितले की, “रविवारी पहाटे ३.५० च्या सुमारास, आम्हाला मदतीसाठी कॉल आला. आम्ही पहाटे ४ वाजता घटनास्थळी पोहोचलो आणि आम्ही पाहिले की, एक मुलगी धोकादायक स्थितीत पुलाच्या पाईप लाईनला धरून लटकत होती. ” यावेळी कीर्तनाची आई आणि एक वर्षाची बहीण सुद्धा दोघेही बेपत्ता होते.
कीर्तना हिने पोलिसांना सांगितले की, “माझ्या आईबरोबर राहणाऱ्या सुरेशने आम्हाला राजमहेंद्रवरम येथे नेले. सेल्फी घेण्याच्या बहाण्याने त्याने कार रावुलापलेम ब्रिजवर थांबवली आणि आम्हा तिघांना गोदावरी नदीत ढकलून दिले.”
हे ही वाचा<< बायको कॉफीत ब्लीच ओतून देते कळूनही नवरा रोज पितच राहिला; एकदा पोलिसांकडे गेला अन्…
दरम्यान, पोलिसांनी दोन पथके तयार करून बेपत्ता ३६ वर्षीय सुहासिनी आणि एक वर्षीय जर्सीचा शोध सुरु केला आहे तर आणि दुसरी टीम आरोपी सुरेशला पकडण्यासाठी तपास करत आहेत.