Who is PHD Sabzi Wala: परिस्थिती माणसाचं शिक्षण, पद, रुबाब सगळं काही एका क्षणात बदलून टाकू शकते असं म्हणतात. अगदी भल्या भल्या मातब्बरांना सुद्धा वेळेच्या प्रकोपाने रस्त्यावर राहण्याची वेळ आल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर असतील. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आपल्या हातात असेलच असे नाही पण परिस्थितीला सामोरे जाणे हे निश्चितच आपल्यावर अवलंबून आहे. अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे अगदी बिकट स्थितीतही अढळ असणारे काही लढवय्ये सुद्धा आपण आपल्याच आजूबाजूला पाहू शकतो. हार न मानता ‘या’ नाही तर ‘त्या’ मार्गाने जगण्याची उमेद राखणे हे कसब ज्या व्यक्तीने आत्मसात केलेले असेल त्याला संकटे कधीच अडथळा ठरत नाहीत असं म्हणतात आणि हीच शिकवण एका शिक्षकाने सोशल मीडियाला स्वतःच्या उदाहरणातून दिली आहे.

चार पदव्युत्तर पदव्याआणि पीएचडी नावावर असलेला पंजाबमधील एक माणूस पोटापाण्यासाठी भाजीपाला विकत आहे असे दृश्य सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. प्राप्त माहितीनुसार, डॉ. संदीप सिंग (३९) हे पटियाला येथील पंजाबी विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापक होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना नोकरी सोडून पैसे कमावण्यासाठी भाजीपाला विकण्याचा मार्ग पत्करावा लागला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

डॉ. संदीप सिंग हे पंजाबी विद्यापीठाच्या कायदा (Law) विभागात ११ वर्षे कंत्राटी प्राध्यापक होते. त्यांनी लॉ विषयातच पीएचडी केली आहे आणि पंजाबी, पत्रकारिता आणि राज्यशास्त्र या विषयांत चार पदव्युत्तर पदव्या घेतल्या आहेत. अजूनही त्यांचा अभ्यास सुरु आहे. मात्र पगार कपात आणि अनियमित पगार यासारख्या अडथळ्यांमुळे त्यांना एका आश्चर्यकारक निर्णय घ्यावा लागला आहे.

सिंग यांनी आपली नोकरी सोडण्याबाबत म्हटले की, “मला नोकरी सोडावी लागली कारण मला माझा पगार वेळेवर मिळत नव्हता आणि वारंवार पगारात कपात होत होती. त्या नोकरीतून उदरनिर्वाह करणे माझ्यासाठी कठीण झाले होते. म्हणूनच मी जगण्यासाठी भाजीपाला विकण्याचा मार्ग स्वीकारला. माझे आणि माझ्या कुटुंबाचे यातच हित आहे.”

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सिंग यांची भाजीची गाडी वजा सायकल दिसून येते ज्यावर ‘पीएचडी सब्जी वाला’ असा फलक लावलेला आहे. याच सायकलवरून डॉ. संदीप सिंग रोज घरोघरी जाऊन भाजी विकतात. ते सांगतात की प्राध्यापक असताना जितकी कमाई होत होती त्यापेक्षा जास्त पैसा भाजी विकून होते. पूर्ण दिवस काम केल्यानंतर, जेव्हा मी घरी परततो तेव्हा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ सुद्धा हाताशी असतो. तसेच अध्यापनातून ब्रेक घेतला असला तरी डॉ.संदीप सिंग यांनी आपली आवड सोडलेली नाही. पैसे वाचवून एक दिवस स्वतःचे शिकवणी केंद्र सुरु करण्याची त्यांची इच्छा आहे.

हे ही वाचा<< सामन्यात ७० धावा केल्या, मग गोलंदाजी करताना अचानक.. क्रिकेट खेळताना २२ वर्षीय तरुणाचं दुर्दैवी निधन!

दरम्यान, अशाप्रकारे रोजगाराच्या समस्यांमुळे यामुळे ग्रॅज्युएट वडापाव, एमबीए चहावाली, बी टेक चहावाला असे अनेक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गमतीचा भाग म्हणून याकडे पाहिले जात असले तरी इतकं उच्चशिक्षण घेऊनही त्याप्रमाणे योग्य नोकरी न मिळणे हे खरोखरच दुर्दैवी म्हणता येईल.

Story img Loader