सोशल मीडियावर कधी कोणता आणि व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कधी प्राण्यांच्या शिकारीचे तर कधी लोकांनी बनवलेल्या अनोख्या जुगाडांच्या व्हिडीओंचा समावेश असतो. जुगाडू व्हिडीओमध्ये कधी कोणी गाडीचं हेलिकॉप्टर बनवतो, तर कोणी भंगारातून ट्रॅक्टर बनवतो. असे अनेक भन्नाट जुगाडांचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. पण सध्या एका व्यक्तीने बनवलेल्या विचित्र जुगाडाचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. कारण व्हिडीओथील व्यक्तीने चक्क पल्सर बाईकचे रूपांतर चार चाकी बाईकमध्ये केले आहे. जे पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो.
जेव्हा आपण चारचाकी म्हणतो तेव्हा आपल्या मनात फक्त कार किंवा मोठे वाहन येते, परंतु तुम्ही कधी ४ चाकी बाईक पाहिली आहे का? जर तुम्ही पाहिली नसेल तर आज तुम्हाला चार चाकी बाईक देखील पाहायला मिळणार आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पल्सरवर बसून अतिशय आरामात बाईक चालवताना दिसत आहे. पण ही बाईक तुम्हाला नक्कीच विचित्र वाटू शकते. कारण या व्यक्तीने त्याच्या बाईकला अधिकची दोन चाके जोडली आहेत. व्हिडीओतील बाईकच्या चाकाखाली आणखी एक चाक जोडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चार चाकी बाईक असाच या बाईकचा उल्लेख करावा लागत आहे.
बाईकबरोबर केलेला विचित्र जुगाड पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. तर अनेक नेटकरी या जुगाडाचा फायदा काय? असा प्रश्न विचारत आहेत. हा व्हिडीओ crackmind111 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ११ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, “भाऊ, तुम्ही खाली कसे उतरणार?” तर आणखी एकाने लिहिलं, “याचा काय फायदा, पेट्रोल तर तेवढेच लागणार आहे.”