Cricket Viral Video : क्रिकेट हा असा खेळ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. प्रत्येक घरात तुम्हाला एक क्रिकेटचा चाहता दिसून येतो. टिव्हीवर क्रिकेटचा एखादा सामना बघण्यासाठी घरातील सर्व लोक टिव्हीसमोर येऊन बसतात. जसे काही लोकांना क्रिकेट पाहायला आवडते तसे काही लोकांना क्रिकेट खेळायला सुद्धा आवडते. त्यामुळे प्रत्येक शहरात किंवा गावातील रस्त्यांवर किंवा मैदानावर मुले क्रिकेट खेळताना दिसतात. तुम्ही आजवर असे अनेक शाळकरी किंवा तरुण मुले पाहिली असतील, जे मित्रांबरोबर आवडीने क्रिकेट खेळतात पण तुम्ही कधी चार वर्षाच्या मुलाला क्रिकेट खेळताना पाहिले आहे का?

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चार वर्षाचा चिमुकला तुफान बॅटिंग करताना दिसून येत आहे. या चिमुकल्याची बॅटिंग पाहून कोणीही थक्क होईल. चार वर्षाच्या मुलाला बॅट सुद्धा नीट धरता येत नाही, असे अनेकांना वाटू शकते पण हा या व्हिडीओत हा चिमुकला थेट फटकेबाजी करताना दिसत आहे.

AIIMS student rents room for Rs 15
एका खोलीचं महिन्याचं भाडं फक्त एका वडा पाव एवढंच; कुणालाच बसत नाहीये विश्वास, फोटो बघाल तर म्हणालं असं घर हवं
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
lawrence bishnoi munawar faruque murder plan
“मला गोदारनं फोन करून मुनव्वर फारूकीच्या हत्येची सुपारी दिली”, मारेकऱ्यानं चौकशीत केलं कबूल; यूकेमध्ये रचला हत्येचा कट!
59-year-old man fell in one side love with 17-year-old girl and hit bike due to rejection
५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…
Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
school van driver rapes school girl
पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड
man dies in kerala hospital after treated by fake doctor
धक्कादायक! १२ वर्षांपासून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करू न शकणाऱ्या बोगस डॉक्टरकडून रुग्णावर उपचार; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Counselling Different behaviors by mother with two sisters
समुपदेशन : आईकडून बहिणींमध्ये दुजाभाव?

चार वर्षाच्या चिमुकल्याची बॅटिंग एकदा पाहाच!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही मुले रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहे. या मुलांमध्ये एक चिमुकला सुद्धा दिसतो जो बॅटिंग करत आहे. चार वर्षाच्या या चिमुकल्याची बॅटिंग पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. चिमुकल्याची फटकेबाजी पाहून कोणीही त्याचा चाहता होईल. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : शौचास बसलेल्या व्यक्तीच्या शरीराला भलामोठ्या अजगराचा विळखा अन् गिळणार तितक्यात…; जंगलातील धडकी भरविणारा Video Viral

असं म्हणतात भारतात टॅलेंटची कमतरता नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे खरं वाटेल. एवढ्या कमी वयात या मुलाची जिद्द, चिकाटी आणि क्रिकेटवरील आवड पाहून भविष्यात हा मुलगा देशासाठी क्रिकेट खेळू शकतो, असा विश्वास निर्माण होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Pakistan Woman Social Post: “पाकिस्तानमध्ये मुलगी म्हणून जगणं फार कठीण”, तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; सांगितला धक्कादायक अनुभव!

adiyogi360_cricketer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “क्रिकेट” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुढील रोहित शर्मा” तर एका युजरने लिहिलेय, “भारताचा भविष्यातील फलंदाज स्टार” आणखी एका युजरने लिहिलेय, “आणखी एक सचिन तयार होत आहे” अनेक युजर्सनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.