सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील एका धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालादेखील धक्का बसेल. कारण व्हिडीओमध्ये एका भटक्या बैलाने चार वर्षाच्या चिमुकलीला जोराची धडक देत अक्षरश: चिरडल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलिगढ शहरातील गांधी पार्क पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानीपूर मंडी परिसरात ही घटना घडली. मुलीचा रडल्याचा आवाज ऐकून काही लोकांनी तिला बैलाच्या तावडीतून सोडवलं आणि रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तो पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल –

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका रस्त्यावर ४ वर्षाची मुलगी उभी असल्याचं दिसत आहे. याच वेळी समोरून एक बैल अचानक मुलीच्या दिशेने धावतो आणि तिला शिंगांनी उचलून फेकतो. बैल एवढ्यावरच न थांबता मुलीला रस्त्यावर आपल्या शिंगानी फरपटत घेऊन जातो आणि मुलीला पायाखाली दाबण्याचा प्रयत्न करतो. यावेळी सुदैवाने एक व्यक्ती रस्त्यावरून धावत येतो तर आणखी एक स्कूटीवरून आलेला माणूनसही तिथे थांबतो आणि मुलीला बैलाच्या तावडीतून सोडवतात. घटनेनंतर मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यांच सांगण्यात आलं आहे.

हेही पाहा- दारुसह Viagra खाणं जीवावर बेतलं! मेंदू व किडनीवर काही सेकंदातच असा झाला प्रभाव

हेही पाहा- पक्ष्यांपासून पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड; Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त करत भटक्या जणावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शिवाय ते दोन नागरिक ऐनवेळी पोहचले नसते तर, चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला असता, त्यामुळे यांचा बदोबस्त करण्याची आवश्यकता असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 year old girl crushed by bull in uttar pradeshs aligarh cctv footage of incident goes viral jap