लखनऊची अनन्या वर्मा अजून पाच वर्षाचीदेखील झाली नसताना लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याच्या खूप जवळ आहे. ४ वर्ष ११ महिन्यांची अनन्या सोमवारी अधिकृतरित्या ९वी इयत्तेची विद्यार्थीनी झाली. लवकरच ती विक्रम प्रस्थापित करणार आहे. शिक्षण विभागाच्या संमतीनंतर अनन्याला लखनऊच्या शाळेतील ९वी इयत्तेत प्रवेश देण्यात आला. जवळजवळ दोन वर्षांच्या आत ती बोर्डाची परिक्षा देईल. तिने बोर्डाची परिक्षा पास केली, तर ती तिच्या बहिणीचा विक्रम मोडेल. अनन्याची बहिणी सुषमा वर्माने २०१७ मध्ये १०वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यावेळी सुषमाचे वय ७ वर्षांपेक्षा थोडे अधिक होते. दोघी बहिणी लखनऊमधील सेंट मीरा इंटर कॉलेजमध्ये शिकतात. सध्या १५ वर्षाची असलेली सुषमा मायक्रोबायलॉजीमध्ये डॉक्टरेट करत आहे. एवढेच नव्हे तर अनन्या आणि सुषमाच्या भावानेही अवघ्या नवव्या वर्षी १०वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
अनन्याचा जन्म १ डिसेंबर २०११चा असून, तिच्या वडिलांचे नाव तेज बहादुर वर्मा असे आहे. ते बाबासाहेब भीमराव अंबेडकर विश्वविद्यालयात सहायक पर्यवेक्षक म्हणून कामाला आहेत. अनन्याची आई छाया देवी यांना लिहीता आणि वाचता नाही. अनन्याची बहिण आणि भाऊ सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा हुशार आहेत, परंतु अनन्या त्यांच्यापेक्षा हुशार असल्याचे शाळेच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. ही सर्व देवाचीच कृपा आहे. मुलांना सुरुवातीपासूनच शिकायची इच्छा होती, परंतु त्यांना शिकविण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळेच की काय देवाने त्यांना विशेष प्रतिभा बहाल केली, असे अनन्याचे वडील म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा