‘कधीतरी मला माझ्या स्वप्नाचा राजकुमार मिळेलच ना!’, ‘मला मनासारखा मुलगा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी थांबायला तयार आहे’ हल्ली स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या प्रत्येक मुलीच्या तोंडी अशी वाक्य सर्रास असतात. पूर्वी महिलांकडे आपल्या जोडीदाराबाबत पर्यायच उपलब्ध नव्हते. कुटुंबीय जो मुलगा पसंत करतील त्याच्याची लग्न करण्याची पद्धत होती. पण आता आपल्या मनासारखा जोडीदार निवडण्याइतकं स्वातंत्र्य महिलांकडे आहे. पण इतकं स्वातंत्र असून किंवा वाट पाहूनही मनासारखा जोडीदार मिळाला नाही तर?

वाचा : तुम्हीसुद्धा प्रेमात आहात? मग ही जय आणि सुनिताची प्रेमकहाणी नक्की वाचा…

इटलीमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय लॉरा मेसीसोबत असंच काहीसं झालं. १२ वर्षांचं लिव्ह इन रिलेशनशिप केव्हाच तुटलं. तो गेला तर काहीच हरकत नाही त्याच्यापेक्षाही चांगला मुलगा माझ्या आयुष्यात येईल. या उमेदीने ती पुन्हा जगायला लागली. पण वयाची चाळीशी ओलांडली तरी तिच्या स्वप्नातला राजकुमार काही आला नाही. कुटुंबीयांनीही तिच्यासाठी उत्तम जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला नाही. त्यामुळे तिने स्वत:शी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वत:शीच लग्न करणारी ती इटलीमधली पहिली महिला ठरली. तिने मोठ्या थाटामाटात आपला लग्नसोहळा पार पाडला. लग्नावर तिने जवळपास साडेसात लाख खर्च केले. एवढंच नाही तर ती स्वत: हनिमूनला देखील जाणार आहे.

Viral : तिने केली नवऱ्याच्या डोक्याची ‘मंडई’!

Story img Loader