उत्तर प्रदेशातील अलीगढ हे कुलुपांसाठी जगप्रसिद्ध आहे. येथे राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याने असे कुलूप बनवले आहे की, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अलिगढ ज्वालापुरी येथील रहिवासी सत्यप्रकाश यांनी पत्नी रुक्मणीसह जगातील सर्वात मोठे कुलूप बांधले असून त्याची लांबी १० फूट असल्याचे सांगितले जात आहे. आणि हो, असा दावा केला जात आहे की हे कुलूप ४०० किलोचे आहे जे ३० किलोच्या चावीने उघडले जाऊ शकते.
किंमत २ लाख रुपये
‘IANS’ च्या वृत्तानुसार, अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराला समर्पित करण्यासाठी या जोडप्याने हे मोठे कुलूप तयार केले आहे. सुमारे २ लाख रुपये खर्चून बनवलेले हे कुलूप तयार करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागला असून त्यावर रामदरबाराचा आकारही कोरण्यात आला आहे.
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)
कुलूप बनवण्यासाठी घेतले व्याजाने पैसे
‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, ६ इंच जाडीचे हे कुलूप लोखंडाचे आहे. कुलूपाची कडा ४ फुटांची आहे. यासाठी दोन चाव्या तयार करण्यात आल्या आहेत. ६५ वर्षीय सत्यप्रकाश मजुरीवर कुलूप तयार करतात. ते म्हणाले- या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे. व्याजाने पैसे घेऊन त्यांनी काम केले आहे.
(हे ही वाचा: तो कुत्रा आहे असं वाटतंय? मग हा Viral Video शेवटपर्यंत बघाचं!)
कुलुपांमध्ये अनेक बदल करावे लागतील
अयोध्येला पाठवण्यापूर्वी या लॉकमध्ये अनेक बदल करण्यात येणार असल्याचे सत्यप्रकाश यांनी सांगितले. लॉकवर स्टीलची स्क्रॅप सीट बसवली जाईल, जेणेकरून त्यावर गंज लागणार नाही. मात्र, त्यासाठी त्याला आणखी पैशांची गरज असून, त्यासाठी तो लोकांकडून मदतीची याचना करत आहे.
(हे ही वाचा: डुकराच्या हृदयाचं मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण; रुग्णाला मिळालं जीवनदान!)
(हे ही वाचा: नागालँडच्या पर्वतांमध्ये पहिल्यांदाच दिसला क्लाउडेड बिबट्या, फोटो Viral)
कुलुपांची झांकी बनवायची आहे
सत्यप्रकाश पुढे म्हणाले की, २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये त्यांना यापेक्षा मोठ्या कुलूपाची झांकी बनवायची आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना पत्रेही लिहिली. एवढेच नाही तर यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली असून, त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.