प्रेम आंधळं असतं असे अनेक लोक म्हणतात. होय, काही लोकांसाठी ते सत्यच आहे. नजरेला नजर भिडली की प्रेमाची चाहूल लागते, असं म्हणतात. कारण प्रेम करताना काही जण वयाच्या मर्यादेचा विचारंही करत नाही. हृदयात उफाळलेल्या प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी अशा प्रेमीयुगुलांना घाईच झालेली असते. बिहारमध्येही एका अनोख्या प्रेमाची कहाणी समोर आली आहे. एका ४२ वर्षीय शिक्षकाचं त्याच्या २० वर्षीय विद्यार्थीनीसोबत प्रेम जडलं. त्यानंतर या शिक्षकाने मंदिरात जाऊन विद्यार्थीनीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांनी घतलेल्या सात फेऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
संगीतच्या कोचिंग क्लासमध्ये श्वेता इंग्रजी शिकण्यासाठी येत होती. त्यानंतर इंग्रजीचे धडे गिरवत असताना श्वेता आणि संगीत यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर काही दिवसांनी मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्येही २२ वर्षांचं अंतर असतानाही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही रोसडाच्या ठाणेश्वर मंदिरात सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
सर्वात आधी त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालायतही रितसर लग्न केलं. संगीतचं याआधीही लग्न झालं होतं. पण त्याच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर संगीत आणि श्वेताच्या प्रेमकहाणीचा चाप्टर सुरु झाला आणि दोघांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
प्रेमप्रकरणाच्या अनेक कहाण्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येत असतात. प्रेम जडल्यानंतप लगीनघाई झालेल्या जोडप्यांनी रिल्स बनवण्याची फॅडही दिवसेंदिवस वाढली आहे. लग्नसोहळा असो की हळदी समारंभ भन्नाट डान्स करुन मोबाईलवर व्हिडीओ काढायचा आणि लोकांचं मनोरंजन करायचं, असा प्रकार सुरु असल्याचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.