खोटे अकाऊण्ट सुरु करुन आर्थिक गंडा घालतल्याच्या अनेक बातम्या आल्या वाचनामध्ये येतात. अनेकदा खोटे डिपी ठेऊन सोशल मिडिया आणि डेटिंगसाईट्सवरुन समोरच्याला गंडा घालतात. अशाप्रकारे फसवणूक होण्याच्या बातम्याही वरचे वर येत असतात. पण नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार एका ४५ वर्षीय व्यक्तीने एका अमेरिकन महिलेला आपण ‘कल हो ना हो’ सिनेमामधील सैफ अली खान असल्याचे सांगून फसवले. हो वाचताना थोडं हस्यास्पद वाटेल मात्र काही दिवसांपूर्वीच इंडिया टुडेला दिलेल्या माहितीमध्ये संबंधित महिलेने याबद्दल सांगितले आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या ४४ वर्षीय अॅना रोवी यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. २०१५ साली या महिलेला टिंडर या डेटींग अॅप्लिकेशनवर एक व्यक्ती भेटली. या व्यक्तीने स्वत:चा प्रोफाइल फोटो म्हणून हिंदी सिनेमातील अभिनेता सैफ अली खानचा फोटो वापरला होता. या महिलेबरोबर अनेक महिने टिंडरवरून गप्पा मारल्यानंतर संबंधित अकाऊण्टवरील व्यक्तीने अचानक तिच्याशी बोलणे बंद केले. नंतर समोर आलेल्या माहितीनुसार अॅनाला फसवणाऱ्या या व्यक्तीचे नाव अँथनी रे असल्याचे समजले. अँथनी हा घटस्फोटीत असल्याचेही समजते.
या सर्व प्रकाराला चार वर्षाचा कालावधी झाला आहे. या चार वर्षांनंतर आता अॅना वकील झाली आहे. आपल्याला आलेल्या फसवणूकीचा अनुभव इतरांना येऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून अॅना अशाप्रकारच्या प्रकरणांमधील पिडीतांना मोफत मदत करते. अॅना ही अमेरिकन पोलिसांच्या संपर्कात असून दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने डेटींग अॅप्लिकेशनवर असणे कायद्याने गुन्हा ठरवण्यात यावा असं अॅनाचं मत असून त्यासाठी आता ती कायदेशीर लढाई लढत आहे.