Electricity Bill Subsidy Cancelled Viral Video: लाइटहाऊस जर्नलिझमला आतिशी मार्लेना यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आतिशी या सध्या दिल्ली सरकारमध्ये शिक्षण, PWD, संस्कृती आणि पर्यटन मंत्री म्हणून कार्यरत आहे. व्हायरक होणाऱ्या व्हिडीओमध्ये आतिशी म्हणतात की, “४६ लाख कुटुंबांना वीज सबसिडी मिळणार नाही”. हा व्हिडीओ शेअर करताना लोकांनी केजरीवाल सरकारवर टीका करत घ्या निवडणुका संपताच यांची सबसिडी पण संपली अशा शब्दात सुनावले आहे. दरम्यान तपासाच्या वेळी या व्हिडीओमागील खरी स्थिती समोर आली आहे, नेमकं आतिशी असं म्हणाल्या का आणि म्हणाल्या असतील तर त्यामागचं कारण काय हे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

X युजर @sbsaraswati ने हा विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

https://x.com/sbsaraswati/status/1795275708689977426

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

https://x.com/RajeshP42031571/status/1794595615458078914
https://x.com/SrimantiG/status/1793585516895698957

तपास:

आम्ही आमचा तपास ह्या व्हिडीओच्या किफ्रेम्स वर रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून सुरु केला.आम्हाला त्यातून एका प्रेस कॉन्फेरन्सचा व्हिडिओ सापडला.

या परिषदेचा हा पहिला भाग आहे जो क्लिप केला गेला होता आणि एका वर्षापासून चुकीच्या संदर्भासह शेअर केला जात आहे.

परिषदेच्या सुरुवातीला, आतिशी यांनी या विधानाने सुरुवात केली की, दिल्लीच्या आप सरकारद्वारे ४६ लाखांहून अधिक कुटुंबांचे अनुदान बंद केले जाईल. त्यानंतर त्या म्हणतात की लोकांना वाढीव दराने बिले मिळू लागतील.मात्र नंतर व्हिडीओमध्ये आतिशी मार्लेना म्हणतात, दिल्लीच्या केजरीवाल सरकारने सबसिडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फाइल अद्याप एलजी (दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर) यांच्याकडे आहे. जोपर्यंत दिल्ली सरकारला फाईल परत मिळत नाही, तोपर्यंत केजरीवाल सरकार अनुदानाची रक्कम सोडू शकणार नाही.

अनेक वृत्त माध्यमांनीही या पत्रकार परिषदेचे कव्हरेज केले होते.

एका बातमीतही असा उल्लेख आहे की, दिल्लीच्या उर्जा मंत्री, आतिशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले की एलजीने अद्याप फाईल क्लियर करणे बाकी असल्याने शहरातील वीज सबसिडी थांबेल. तर राज निवास म्हणाले की एलजीने एका दिवसात फाइलवर स्वाक्षरी केली होती. आतिशी यांनी दावा करण्यापूर्वीच शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना ती फाईल पाठवण्यात आली होती.

https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/delhi-power-subsidy-cleared-as-minister-atishi-and-lg-office-spar/articleshow/99502946.cms

हे ही वाचा<< भाजपाच्या महिला आमदारांनी झळकवले ‘गो बॅक मोदी’चे पोस्टर? सद्गुरूंचा संबंध पाहून लोक चक्रावले, ही चूक पाहिलीत का?

आम्हाला पत्रकार परिषदेवर AAP अधिकृत हँडलची पोस्ट देखील आढळली. हा व्हिडिओ १४ एप्रिल २०२३ रोजी ट्वीट करण्यात आला होता.

निष्कर्ष: आप मंत्री आतिशी मार्लेना यांच्या पत्रकार परिषदेतील जुना, कट केलेला व्हिडिओ अलीकडील असल्याचे सांगून व्हायरल झाला आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 46 lakh families electricity bill subsidy cancelled energy minister viral video makes people angry reality controversy watch check facts here svs
Show comments