जगातील सगळ्यात तिखट मिरची म्हणून ‘भूत झोलकिया’ ही मिरची ओळखली जाते. ही मिरची इतकी तिखट असते की त्याची कल्पनाही कोणी करु शकत नाही पण ही मिरची खाऊन आपण नवा विक्रम करु असे एकाला वाटले आणि त्याने ती खाल्लीही, पण या मुर्खपणाची चांगलीच किंमत त्याला भोगायला लागली. तिखट मिरची खाल्ल्याने त्याच्या अन्न नलिकेला छिद्र पडले पण त्याचबरोबर निर्माण झालेल्या प्रकृतीच्या अनेक समस्येमुळे त्याला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे.
४७ वर्षीय अमेरिकन माणसाने एका स्पर्धेत भाग घेतला होता. भुत झोलकिया मिरची खाण्याची ही स्पर्धा होती. ही मिरची खाणे जीवावर बेतू शकते हे माहिती असूनही त्याने ही मिरची खाण्याचे धाडस केले. पण ही मिरची खाल्ल्याने त्याला लगचेच छातीत दुखणे, उलट्या असे त्रास होऊ लागले. तर त्याच्या अन्न नलिकेला देखील छिद्र पडले आहे. जवळपास अडीच सेंटीमीटरचे छिद्र त्याच्या अन्ननलिकेला पडल्याने तातडीने या माणसावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला महिनाभर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
भूत झोलकिया ही जगातील सगळ्यात तिखट मिरची असून २००७ साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही देखील तिच्या नावाची नोंद आहे. बांग्लादेशसह भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणीपूरमध्ये तिचे पिक घेतले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा