Woman Marries Dog After Divorcing Husband: सोशल मीडियावर अलीकडे सर्व प्रकारच्या लग्नाचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. एक नवरा व एक नवरी या साधारण नियमाला छेद देऊन अलीकडे समलैंगिक लग्न, स्वतःशीच लग्न, एकाच वेळी दोन तरुणींशी लग्न असेही प्रकार व्हायरल होत असतात. अशा निर्णयातून प्रत्येकजण आपआपला आनंद निवडतो. पण अलीकडेच एका महिलेने चक्क आपल्या कुत्र्याशी लग्न केल्याचे समजत आहे. ४९ वर्षीय अमांडा रोजर्स नामक महिलेने कुत्र्याशी लग्न करण्यासाठी आपल्या नवऱ्याला घटस्फोट सुद्धा दिला. काही दिवसांपूर्वी अमांडाने एका मुलाखतीत आपल्या अजब प्रेमाची गजब कहाणी सर्वांना सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमांडा रोजर्स ही लंडन येथील क्रोएशिया भागात राहणारी एक ४९ वर्षीय महिला आहे. २०१४ मध्ये तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला होता. त्यावेळेस तिच्याकडे एक २ महिन्याचा कुत्रा होता ज्याचे नाव होते शेबा. अमांडा सांगते की शेबा तिच्याशिवाय एक मिनिटही राहू शकत नव्हता आणि तो सतत तिच्या आजूबाजूला असायचा, जे प्रेम नवऱ्याकडून प्रेम मिळाले नाही तेच प्रेम त्याच्या डोळ्यात स्वतःसाठी पाहताच तिने शेबाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अर्थात हा विचित्र निर्णय ऐकता सगळ्यांनी अमांडाची थट्टा केली पण तिने आपल्या प्रेमाची साथ सोडली नाही. उलट अगदी धामधुमीत लग्न करण्याचे ठरवून तिने २०० जणांना आपल्या लग्नाची पत्रिका सुद्धा पाठवली. या लग्नात माणसाच्या लग्नाप्रमाणेच सर्व रीती- परंपरा पाळल्या गेल्या. २०० पाहुण्यांच्या समोर अमांडाने शेबाला नवरा म्हणून स्वीकारले.

हे ही वाचा<< Video: टॉमी झाला नवरा, जेली नवरीबाई.. माणसांपेक्षा थाटात लागलं लग्न; वरातीत पाहुण्या कुत्र्यांची भन्नाट पार्टी

दरम्यान, साहजिकच या जोडप्याच्या लग्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तुला काय माणूस सापडला नाही का? कुत्र्याची परवानगी घेतली होती का? असे प्रश्न अनेकांनी तिला केले. तर काहींनी तिच्या या निर्णयाचे समर्थन करत आपल्याला ज्याच्याकडून आनंद मिळतो त्याच्यासह राहावे असे म्हणत कमेंट्स केल्या. तुम्हाला अमांडा रोजर्सच्या या निर्णयाविषयी काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा.