सिंह, वाघ, बिबट्या… जे शिकार करण्यात इतके तरबेज असतात की समोरच्याला काही समजायच्या आतच ते त्याच्यावर हल्ला करतात. एकाच फटक्यात ते शिकार करतात. त्यांच्या ताकदीसमोर कोणत्याच प्राण्याचं चालत नाही. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. अशा एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क पाच वाघांनी एका छोट्याशा कुत्र्याला घेरलं. पण पुढे जे काही झालं ते पाहून प्रत्येक जण आश्चर्य होताना दिसून येत आहेत.
वाघ हा जंगलातील सर्वांत हिंस्त्र आणि आक्रमक प्राणी आहे, असं म्हटलं जातं. मात्र, हा व्हिडीओ पाहून तुमचे विचार बदलतील. कारण या व्हिडीओमध्ये वाघाने जे काही केलंय, ते पाहून विश्वास ठेवणं थोडं अवघड होईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक कुत्रा एका दगडाच्या आड लपून बसलेला दिसून येतोय. लपून बसलेल्या कुत्र्याच्या आजुबाजुला पाच वाघ घेराव घालताना दिसून येत आहेत.
काही मिनिटांसाठी असं वाटू लागतं की हे पाचही वाघ कुत्र्याची शिकार करणार. पण यातला एक वाघ कुत्र्याजवळ जातो आणि वाघ घेतो. त्यानंतर तो कुत्र्याला गोंजारू लागतो. इतके सारे वाघ आता आपल्याला खाऊन घेणार या भितीने कुत्रा देखील पुरता घाबरलेला दिसून येतोय. या पाचही वाघांच्या डोक्यात नक्की काय चाललंय, हा विचार व्हिडीओ पाहून डोक्यात येतो. पुढे असं नक्की काय होतं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
yournaturegram नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करून अवघे दोन दिवस उलटले आहेत, तर आतापर्यंत २.८ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. १ लाख ७४ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तसंच या व्हिडीओवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.