तुम्हाला एस्केलेटरवर वेड्यावाकड्या पद्धतीने उभी राहण्याची किंवा मस्ती करण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. चीनमध्ये एस्केलेटरवर मस्ती करणे एका लहान मुलीला चांगलेच महागात पडले. एस्केलेटरच्या बाजूला असणाऱ्या हॅण्डरेलवर गरजेपेक्षा जास्त वेळ हात ठेवल्याने या मुलीचा हात अडकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील हंचुआन शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. पाच वर्षांची मुलगी एस्केलेटरवरुन वर येत असताना तीने अगदी शेवटपर्यंत आपला हात हॅण्डरेलवर ठेवला. वर पर्यंत पोहचल्यानंतरही तिने आपला हात हॅण्डरेलवरुन उचलला नाही आणि तो हॅण्डरेल जिथून पुन्हा खाली जातो तिथपर्यंत तीने हात त्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान वेळीच तिने हात काढला नाही आणि तिचा हात हॅण्डरेलबरोबर खाली गेला. व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे या पाच वर्षांच्या मुलीबरोबर असणाऱ्या तिच्या आईे तिला बाहेर खेचण्यास सुरुवात केली. तोपर्यंत आजूबाजूचे लोकही तेथे जमले होते.

या मुलीचा जवळजवळ अर्धा हात एस्केलेटरच्या हॅण्डरेलमध्ये अडकल्याने ती जमीनीवर पडून होती. मॉल प्रशासनाने स्थानिक अग्निशामन दलाला कॉल केला. अवघ्या दहा मिनिटांमध्ये अग्निशामन दलाचे जवान घटास्थळी दाखल झाले. त्यांनी हॅण्डरेलवरील प्लॅस्टीकचे आवरण फोडून या मुलीचा हात बाहेर काढला. या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या हाताला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. या मुलीच्या हाताला टाके घालण्यात आले असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या प्रसंगावरुन एस्केलेटरवर असताना उगच मस्ती करणे महागात पडू शकते हेच दिसून येत असल्याचे मत अनेकांनी व्हिडिओखालील कमेंटमध्ये व्यक्त केले आहे.