देशात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत असतात. अशातच हैदराबादमध्ये ५ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही व्हिडीओत कैद झाली आहे.

गुरूवारी सायंकाळी दिलसुखनगर येथील परिसरात ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओत दोन मुले घराबाहेर खेळताना दिसत आहे. त्याचवेळी परिसरातील कुत्रे मुलांच्या मागे धावताना दिसतात. त्यानंतर मुलांनी तातडीनं घरात धाव घेतली. पण, एका भटक्या कुत्र्यानं मुलाला चावा घेतला.

Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

हेही वाचा : अचानक अंगावर धावून आली मगर, आजोबांनी मारला पॅन; पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral

दरम्यान, हैदराबादमध्ये अलीकडे मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मनोकोंडूर मंडळाच्या हद्दीतील पोचम्मापली गावात सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर शाळेच्या बाहेर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यानंतर १३ वर्षीय मुलीवर हैदराबाद येथील गांधी रूग्णालयात उपचार सुरू होते. पण, ४० दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : निर्दयी बाप! भर रस्त्यात पत्नीला अन् लेकराला कारमधून बाहेर पाडलं; चिमुरडा रडत राहिला तरीही…

तर, गेल्या महिन्यात बहादूपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदी मुसलाईगुडा येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा गंभीर झाला होता. या मुलावर हैदराबाद येथील निलोफर रूग्णालयात उपचार सुरू होते.