कोटास्थित व्यक्तीने निव्वळ ३५ रुपयांचा परतावा मिळवण्यासाठी भारतीय रेल्वेशी तब्बल ५ वर्षे लढाई लढली आणि ती जिंकलीही. सुजीत स्वामी यांनी ही कायदेशीर लढाई लढली असून या प्रक्रियेत त्यांनी जवळपास तीन लाख लोकांना मदत केली, ज्यांना अशाच गोष्टींचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या परताव्यासह, रेल्वेने २ लाख ९८ हजार आयआरसीटीसी वापरकर्त्यांना २ कोटी ४३ लाख रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, स्वामी यांनी खुलासा केला आहे की त्यांनी त्यांचा परतावा मिळवण्यासाठी जवळपास ५० माहिती अधिकार (आरटीआय) अर्ज दाखल केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ते म्हणाले, “सुमारे ५० आरटीआय अर्ज, रेल्वे, आयआरसीटीसी, वित्त मंत्रालय आणि सेवा कर विभाग यांना सतत पाठवलेली पत्रे, यामुळे हा लढा खरोखरच लांबला होता, परंतु अखेरीस मी समाधानी आहे कारण माझ्यासह सर्व वापरकर्त्यांना २ कोटी ४३ लाख रुपयांचा परतावा मिळेल.”

‘गाढवावरुन ऑफिसला यायची परवानगी द्या’; पाकिस्तानमधील कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल, कारण वाचून आश्चर्य वाटेल

स्वामी यांनी दावा केला आहे, आयआरसीटीसीने त्यांच्या आरटीआय प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की २ लाख ९८ हजार वापरकर्ते, ज्यांपैकी अनेकांनी अनेक तिकिटे खरेदी केली असतील, त्यांना प्रत्येक तिकिटावर ३५ रुपये परतावा मिळेल. ही किंमत एकूण २ कोटी ४३ लाख रुपये इतकी आहे.

“पीएम, रेल्वे मंत्री, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, जीएसटी कौन्सिल आणि अर्थमंत्र्यांना टॅग करून रिफंडची मागणी करण्यासाठी मी वारंवार केलेले ट्विट, २ लाख ९८ हजार वापरकर्त्यांना ३५ रुपयांच्या रिफंडला मंजुरी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,” स्वामी यांनी पीटीआयला सांगितले. जीएसटी लागू होण्यापूर्वी तिकीट रद्द करूनही सेवाकर म्हणून आकारलेले ३५ रुपये परत मिळावेत यासाठी त्यांनी चार सरकारी विभागांना अनेक पत्रे लिहिली.

सप्तपदी दरम्यान वधूचा स्टेजवरच मृत्यू; यानंतर वराने तिच्या बहिणीशी बांधली लग्नगाठ

२०१७ मध्ये, स्वामींनी २ जुलैसाठी गोल्डन टेंपल मेलमध्ये त्यांच्या शहरातून नवी दिल्लीचे रेल्वे तिकीट बुक केले. ७६५ रुपये किमतीचे तिकीट त्यांनी रद्द केले तेव्हा, ६५ रुपयांऐवजी १०० रुपयांच्या कपातीसह त्यांना ६६५ रुपयांचा परतावा मिळाला. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होण्यापूर्वी त्यांनी तिकीट रद्द केले असले तरीही त्यांच्याकडून सेवा कर म्हणून ३५ रुपये आकारण्यात आले.

त्यांनी रेल्वे आणि अर्थ मंत्रालयाला आरटीआय प्रश्न पाठवले. सुरुवातीला, त्यांच्या एका आरटीआयला उत्तर देताना, आयआरसीटीसीने सांगितले की जीएसटी लागू होण्यापूर्वी बुक केलेल्या आणि अंमलबजावणीनंतर रद्द केलेल्या तिकिटांसाठी, बुकिंगच्या वेळी आकारलेला सेवा कर परत केला जाणार नाही. तथापि, स्वामींना पुन्हा आयआरसीटीसीकडून उत्तर मिळाले ज्यामध्ये असे म्हटले आहे की १ जुलैपूर्वी तिकीट बुक केले असल्यास किंवा रद्द केले असल्यास, एकूण सेवा कर परत केला जाईल.

अबब! कडक उन्हात पठ्ठ्याने स्कुटीच्या सीटवर बनवले डोसे; Viral Video पाहून नेटकरी हैराण

१ मे २०१९ रोजी, त्यांना त्यांच्या बँक खात्यात सेवा कराच्या मूल्याच्या पूर्णत: २ रुपयांच्या कपातीसह ३३ रुपयांचा परतावा मिळाला. ते लढत राहिले आणि अखेरीस गेल्या आठवड्यात शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल लागला. रेल्वेने त्यांना सांगितले, “रेल्वे बोर्डाने सर्व वापरकर्त्यांना (२.९८ लाख) परतावा (रु. ३५) मंजूर केला असून परतावा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सर्व प्रवाशांना हळूहळू त्यांचा परतावा मिळेल.”

“सर्व वापरकर्त्यांना ३५ रुपयांचा परतावा मंजूर झाल्यानंतर, माझ्या पाच वर्षाच्या संघर्षासाठी प्रतिवर्षी १०० रुपये असे एकूण ५३५ रुपये मी पीएम केअर फंडला दान केले आहेत.” असे स्वामी यांनी सांगितले.