Viral video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एक अजगर साप थेट एका गाडीच्या इंजीनमध्ये लपून बसला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कारच्या बोनेटमध्ये चक्क भलामोठा ६ फूट लांबीचा अजगर लपून बसलेला दिसत आहे. ही घटना दिल्लीतील चित्तरंजन पार्क परिसरात घडली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओनुसार, कारच्या इंजिनमध्ये ६ फूट लांबीचा अजगर लपला होता. गाडीच्या मालकाला माहिती मिळताच त्यांनी अजगराच्या सुटकेसाठी दिल्लीतील Wildlife SOS या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला, त्यानंतर एसओएसची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर अजगराला बाहेर काढण्यात आलं, अशी माहिती व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: मुंबईतील हा प्लॅटफॉर्म बनला कुस्तीचा आखाडा; दोन प्रवाशांमध्ये लोकलच्या दरवाजातच तुफान हाणामारी, एक चूक अन्…
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ wildlifesos या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.