पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सध्या करोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भातील विषयावरुन टीका होत असतानाच काही दिवसांपूर्वी एका सहा वर्षीय मुलाने पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रारीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. अगदी गोंडस शब्दांमध्ये ही मुलगी मोदींना लहान मुलांवरील ऑनलाइन लेक्चर्सचा भार कमी करण्याची मागणी करत होती. विशेष म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मुलीच्या मागणीचा विचार करण्यात येणार असून ४८ तासांमध्ये लहान मुलांच्या अभ्यासक्रमासंदर्भातील धोरणांचा अहवाल जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मजोन सिन्हा यांनी मागवला आहे. यासंदर्भातील माहिती सिन्हा यांनीच ट्विटरवरुन दिलीय.
मागील वर्षभरापासून अधिक काळ झाला अनेक शाळा आणि कॉलेजमधील लेक्चर्स हे ऑनलाइन माध्यमातून होत आहे. करोनामुळे शाळा, कॉलेजेस बंद असल्याने ऑनलाइन माध्यमातून वर्ग भरवले जात आहेत. ऑनलाइन वर्गांमधील धम्माल आणि गोंधळाची सोशल नेटवर्किंगवर कायमच चर्चा असते. तसा एका वर्षाहून अधिक कालावधी झाल्याने शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही या ऑनलाइन क्लासेसची सवय झालीय. मात्र या ऑनलाइन क्लाससोबतच देशामधील करोनासंदर्भातील बातम्या, घरचा अभ्यास अशा अनेक गोष्टींमुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचंही तज्ज्ञ सांगतात. याचीच झलक सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या एका लहान मुलीच्या व्हिडीओमधून पहायला मिळालं.
काश्मीरमधील सहा वर्षांच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या व्हिडीओमधील लहान मुलगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑनलाइन माध्यमातील शिकवणीनंतर देण्यात येणाऱ्या घरच्या अभ्यासासंदर्भात तक्रार करताना दिसत आहे. “छोटे बच्चो को इतना काम क्यू रखते हो मोदी साब?”, असा प्रश्न ही मुलगी थेट देशाच्या पंतप्रधानांना विचारताना व्हिडीओत दिसते. “बडे बच्चे जो सातवी आठवी मे है उन्हा जादा होमवर्क देना चाहिऐ,” असंही ही चिमुकली या व्हिडीओत म्हणता दिसते. १० ते २ वाजेपर्यंत मला ऑनलाइन शिकवणीला बसावं लागत असल्याची तक्रारही या मुलीने केलीय. इंग्रजी, गणित, उर्दू, पर्यावरण, कंप्युटर अशा अनेक विषयाच्या लेक्चर्सला मला ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावावी लागत आहे.
A six-year-old Kashmiri girl’s complaint to @PMOIndia @narendramodi regarding long hours of online classes and too much of school work. pic.twitter.com/S7P64ubc9H
— Aurangzeb Naqshbandi (@naqshzeb) May 29, 2021
ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी या मुलीची तक्रार फारच गोंडस असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओने यासंदर्भातील उत्तर द्यावं अशी मागणी केलीय. मात्र पंतप्रधान कार्यालयाऐवजी ही मुलगी ज्या जम्मू काश्मीरमधील आहे तेथील नायब राज्यपालांनी या मुलीच्या तक्रारीची दखळ घेतलीय. “ही खूपच गोंडस तक्रार आहे. मी शिक्षण विभागाला लहान मुलांवरील घरच्या अभ्यासाचे ओझे कमी करण्यासंदर्भातील नवीन धोरण ४८ तासांमध्ये तयार करण्यासंदर्भातील आदेश दिलेत. लहान वयातील गोंडसपणा हा देवाने दिलेली देणगी असते. हे दिवस त्यांनी आनंदाने आणि समाधानाने जगले पाहिजे,” असं ट्विट नायब राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.
Very adorable complaint. Have directed the school education department to come out with a policy within 48 hours to lighten burden of homework on school kids. Childhood innocence is gift of God and their days should be lively, full of joy and bliss. https://t.co/8H6rWEGlDa
— Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) May 31, 2021
नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर दिलेल्या काही प्रतिक्रिया पाहुयात…
१)
Hope the @PMOIndia will answer this too…
A very valid question #virtual #classes #schools https://t.co/uSOlHHe1DF
— richa mishra (@RichaMishraBL) May 31, 2021
२)
How cute is this https://t.co/znIjbJoeam
— Ankur Kacker अंकुर कक्कड़ (@ankurkacker) May 31, 2021
३)
This made my day…
Awesome!!!! https://t.co/vWdKHpoPFp— बाबू!!!The Most Valuable Asset (@pm0532dm) May 31, 2021
४)
So cute. The “tch” in the end https://t.co/qnqDmqfZej
— joshitha (@joshithas) May 31, 2021
५)
@PMOIndia @narendramodi plz provide the solution to this cutie pie girl. #cuteee https://t.co/bcuwREvtOu
— Akshay Yadawar (@YadawarAkshay) May 31, 2021
६)
@narendramodi ji … I support this complaint !! https://t.co/O5KoRn7Xy2
— Abhishek Shukla (@shukla__jii) May 31, 2021
७)
Modiji kindly solve her problem@narendramodi https://t.co/cZJvnGG2Qz
— Tapu Kumar Das (@TapuKumarDas2) May 30, 2021
८)
In gloomy days, kids are the only hope we havehttps://t.co/8v7MzOtHMO
— Rakesh Roshan (@RakeshAboveAll) May 31, 2021
९)
Kids need answer Modi Saheb.
Please give them proper answer.@narendramodi https://t.co/v3Y7EKSmC7— Vaibhav Jain (@Vaibhav31620917) May 31, 2021
१०)
Cuteness personified …hope the PMO is listening to what she is complaining and how she is complaining……simply adorable. https://t.co/rL6l7pN602
— Dr Ruchi Anand (@DrRuchiAnand3) May 30, 2021
एकंदरितच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने थेट पंतप्रधानांनी नाही तरी राज्यपालांनी तरी या मुलीच्या तक्रारीची दखल घेतल्याने आगामी काळामध्ये जम्मू काश्मीरमधील शैक्षणिक धोरणांमध्ये काही बदल होतो का हे पाहायला मिळाले.