फेडरर आणि नदाल या दोघांमुळे एव्हाना टेनिस हा खेळ आपल्याला परिचयाचा झाला असेल. हे दोघेही या क्षेत्रातले आघाडीचे खेळाडू त्यामुळे त्यांना खेळताना पाहणं म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच असतेच, पण सध्या दोन खेळाडूंपेक्षा इंटरनेटवर एका वेगळ्याच टेनिसपटूची चर्चा आहे. आता हा टेनिसपटू म्हणजे जपानचा रिकी माकड बरं का!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही म्हणाल हा माकड काय टेनिस खेळणार? पण व्हिडिओ पाहिलात तर तुमचा हा गैरसमज फटक्यात दूर होईल. माकडचाळे करणारा किंवा विचकवून दाखवणारा हा साधासुधा माकड नाही, हातात टेनिस बॅट दिली की कसं खेळायचं हे त्याला बरोबर माहिती आहे. त्याच्या मालकाने याला टेनिसजे चांगलेच धडे दिले आहेत. तेव्हा टिशर्ट आणि पँट घालून ६ वर्षांचा रिकी जेव्हा टेनिसकोर्टवर येतो तेव्हा त्याला पाहणं फारच गंमतीशीर असतं.  रिकी आणि त्याच्या मालकाचा टेनिस खेळतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. टेनिसच्या चाहत्यांना हा टेनिसपटू रिकी भारीच आवडलाय तुम्हालाही हा उमदा खेळाडू नक्की आवडेल.