Marathi Aai Rap Song Video: मराठमोळी आई ही फणसासारखी असते असं म्हणतात. आपल्या मुलांना वेळच्या वेळी समज देण्यापासून ते भक्कमपणे मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापर्यंत कित्येक भूमिका आपल्या आया पार पाडतात. तुम्ही कधी पाहिलंत तर मराठी घरांमध्ये फार क्वचित मुलांचं कौतुक पालक करतायत असं दृश्य पाहायला मिळतं. पण शेजाऱ्या- पाजाऱ्यांमध्ये नातेवाईकांकडे मुलांच्या कौतुकाचे पूल बांधण्यातही आई- वडील मागे हटत नाहीत. साहजिकच कौतुकाची हवा डोक्यात जाऊन मुलं भरकटून जाऊ नयेत म्हणून घरात त्यांना बोलणी खायला लावून शिस्त लावण्याचं पॅरेंटिंग स्किल कित्येक पिढ्यांपासून पुढे पुढे विकसित होत गेलं आहे.
आता स्किल विकसित झालं असलं तरी डायलॉग काही फारसे बदलले नाहीत. अगदी १० वर्षांपूर्वी आई आपल्या मुलांना जे तेच तेच डायलॉग मारून काम करायला सांगायची तीच वाक्य आताही वापरली जातात. आश्चर्य म्हणजे जी मुलं आईची अशी बोलणी खाऊन मोठी झाली आहेत ते सुद्धा आता आपल्या मुलांना हाच फंडा वापरून शिस्तीचे धडे देतात. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही @spitbeat या अकाऊंटवरून व्हायरल झालेला हा मराठी आईचा रॅप नक्की बघा.
@spitbeat म्हणजेच गिरीश वाघचौडे या इंस्टाग्राम युजरने आपल्या पेजवर आईचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये आई बोलत असताना लेकाने गमतीत बिटबॉक्स सुरु केलं होतं पण आईचा बोलण्याचा वेग आणि त्यावर परफेक्ट बिट्स देऊन हा चक्क एक घरगुती रॅपच तयार झाला आहे.
Video: मराठी आईचा Swag भारी
हे ही वाचा<< ‘लप्पु सा सचिन’ म्हणणाऱ्या महिलेचा पती पहिल्यांदा कॅमेरासमोर? Video पाहून लोकं म्हणतात, “सीमाला तर… “
दरम्यान, हा व्हिडीओ काहीच तासात इतका व्हायरल झाला की यावर ८ लाखाच्या आसपास लाईक्स व ६० लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. अगदी यशराज मुखाते पासून ते शिव ठाकरे, रॅपर बादशाह कित्येक मोठमोठ्या कलाकारांनी यावर कमेंट करून आई व लेकाचं कौतुक केलं आहे. हा रॅप बघून तुम्हाला तुमच्या आईची आठवण आली की नाही? यातील शब्द अन शब्द तुम्ही आपापल्या घरी ऐकला आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा.