चित्रपटातील स्पायडरमॅन सर्वांना परिचित आहे. तो मोठ मोठाल्या भिंत्यांवर चढतो. धाडसी कृत्य करून सर्वांना चकित करतो. वास्तविक जीवनात कुणी अजिबात असा प्रयत्न करणार नाही, असे कदाचित तुम्हाला वाटत असेल. पण वास्तविक जीवनात असा एक स्पायडरमॅन आहे आणि तो भिंत्यांवरही चढतो. त्याच्याकडे हे काम करण्यासाठी सुपर पावर नाही, पण कौशल्य आहे.

अलेन रॉबर्ट असे या व्यक्तीचे नाव असून त्याला फ्रेंच स्पायडरमॅन म्हणूनही ओळखले जाते. रॉबर्टने वयाच्या ६० व्या वर्षी १८७ मीटर उंच इमारत चढली आहे. त्यांची ही कामगिरी पाहून लोक हैराण झाले आहेत.

(Viral : पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे काढले भन्नाट चित्र, नेटिझन्सने केला कौतुकांचा वर्षाव, पाहा फोटो..)

म्हणून इमारतीवर चढले रॉबर्ट

४८ मजली इमारत चढून रॉबर्ट यांनी वयाचे ६० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. वयाच्या साठीत आरोग्य आणि इतर शारीरिक प्रश्न उपस्थित होतात. अशा वयात राँबर्ट यांनी ४८ मजली इमारत सर केली. हा प्रताप करण्यामागील हेतू देखील रॉबर्ट यांनी सांगितला. वयाच्या ६० व्या वर्षी देखील लोक खेळू शकतात, सक्रिय राहू शकता आणि अद्भुत गोष्टी करू शकतात, असा संदेश द्यायचा असल्याने आपण ही इमारत चढल्याचे रॉबर्ट यांनी सांगितले.

अलेन रॉबर्ट यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात ते इमारत चढताना दिसत आहे. लाल कपडे घातलेले रॉबर्ट एका भव्य इमारतीवर चढत आहे. या फ्रेंच स्पायडरमॅनला पाहून लोक अवाक झाले आहेत. रॉबर्ट यांनी १९७५ मध्ये गिर्यारोहण सुरू केले. दक्षिण फ्रान्समधील वालेन्स येथे ते प्रशिक्षण घेत होते. १९७७ पासून त्यांनी एकटे गिर्यारोहण करण्यास सुरुवात केली आणि नंतर ते अव्वल गिर्यारोहक बनले.

(Viral video : ‘या’ विशेष विमानाने भारतात आले चित्ते, लूकमुळे आधीच चर्चेत, पाहा विमानाचे आतील दृश्य)

दुबईतील बुर्ज खलिफासह इतक्या इमरातींवर चढाई

रॉबर्ट यांनी दुबईतील बुर्ज खलिफासह जगभरातील १५० पेक्षा जास्त उंच इमारतींवर चढाई केली आहे. रॉबर्ट यांनी आयफेल टॉवर आणि सॅन फ्रान्सिस्को गोल्डन गेट ब्रिजवर देखील चढाई करून अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.

यामुळे अटक देखील झाली होती

रॉबर्ट हे हार्नेसशिवाय केवळ हातांच्या सहाय्याने चढाई करतात. या दरम्यान त्यांच्याकडे केवळ चढाईसाठी वापरले जाणारे बूट असतात आणि घाम पुसण्यासाठी खडूचे पावडर असलेली पिशवी असते. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांना अनेकदा अटक देखील झालेली आहे.

Story img Loader