Lift accident video: आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो. हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही. शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती असणं हे सामान्य आहे. अशा परिस्थितीत या इमारतींपैकी एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लोक लिफ्टचा वापर करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र या लिफ्ट लोकांसाठी जीवघेण्या ठरत असल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे. त्‍यामुळे आपण सर्वांनी यापूर्वी मोठमोठे अपघात झालेले पाहिले आहेत. अशाच एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एक मूकबधिर महिला लिफ्टमध्ये अडकली अन् त्यानंतरची तिची मृत्यूबरोबरची झूंज पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. विशेष म्हणजे ही महिला मुकी असून, तिला ऐकूही येत नाही. अशा स्थितीत तिला मदतीसाठी आरडाओरड करणं किंवा कोणी मदतीसाठी आवाज दिला तर तो ऐकणं शक्य नव्हतं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ६० वर्षीय वृद्ध महिला एका व्यक्तीसोबत पाणीच्या बोटल्स बॉक्स लिफ्टमध्ये ठेवत असते. तो व्यक्ती बोटलचे बॉक्स ठेवून बाहेर जातो त्यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद होतो. लिफ्टचा दरवाजा बंद झाल्यानंतर महिला घाबरुन जाते. लिफ्टचा दरवाजा खोलून बाहेर येण्याचा भरपूर प्रयत्न करते. व्हिडिओच्या शेवटी महिला लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यशस्वी होते आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करते.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार ४ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या महिलेला अग्निशमन दलाच्या १४ जवानांनी सुखरुप बाहेर काढलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चोराचा कॉन्फिडन्स कमी पडला; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात…”क्या चोर बनेगा रे तू”

हा व्हिडीओ sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लिफ्टचं वेळीच मेंटेनन्स आणि ऑडिट करणं गरजेचं आहे. नाहीतर, दिरंगाईमुळे मोठी दुर्घटना घडू शकते. हा व्हिडीओ तसा २०२२ चा आहे. पण तो पुन्हा नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 60 year old woman got stuck in the lift and the cctv footage of the entire incident went viral on social media srk