Viral Video : असं म्हणतात, प्रेमाला वय नसतं. प्रेम हे वयानुसार आणखी वाढत जातं. आज आपण अशाच एका आजी आजोबांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेणार आहोत. त्यांच्या नातवाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याच्या आजी आजोबाची अनोखी प्रेम कहाणी सांगितली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रेम ही अशी एक भावना आहे जी शब्दात व्यक्त केली जाऊ शकत नाही. यात नवरा बायकोचं एकमेकांवरील प्रेम हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेमासह काळजी, जिव्हाळा, आदर आणि आपुलकी दिसून येते आणि वयानुसार हे नातं आणखी दृढ होत जातं. या व्हिडीओत तुम्हाला उतार वयात सुद्धा आजी आजोबा एकमेकांवर किती प्रेम करतात, हे स्पष्टपणे दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओत नातू आपल्या आजी आजोबांच्या अनोख्या नात्याविषयी सांगतो, “खूप गोड गोष्ट तुम्ही आज बघणार आहात. साठ वर्षांपूर्वी माझ्या आजी आजोबांचा प्रेमविवाह झाला होता. ते नेहमी त्यांचा लग्नाचा वाढदिवस खूप उत्साहाने साजरा करतात पण यावर्षी आरोग्याच्या समस्यांमुळे आजीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. ते खूप दिवस एकमेकांना भेटले नाही. जरी त्या दोघांनाही बरे नव्हते तरी सर्वात गोड गोष्ट म्हणजे त्यांना लग्नाच्या वाढदिवशी एकमेकांना गिफ्ट पाठवायचे होते. आजोबांनी आजीला सुंदर गिफ्ट पाठवले तर आजींनी आजोबांना सुंदर फुले पाठवले. अशाप्रकारे त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ३० दिवसानंतर आजी हॉस्पिटलमधून घरी परत आली. दोघेही एकमेकांना पाहण्यासाठी खूप उत्सूक होते. आजीला घ्यायला आजोबा घराच्या बाहेर आले. त्या दोघांचा चेहरा पाहा. मला वाटते मी आयुष्यात सिंगल राहील जोपर्यंत मला असा जोडीदार भेटणार नाही.”

नातू आजी आजोबांचे फोटो आणि व्हिडीओ दाखवून त्यांच्याविषयी सांगताना दिसतो. आजी आजोबांचे एकमेकांवरील प्रेम पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना त्यांच्या आजी आजोबांची आठवण येईल.

हेही वाचा : अशीही बनवाबनवी! सायकलपासून बनवली रस्त्यावर धावणारी रेल्वेगाडी, कामगारांचा अनोखा जुगाड पाहिला का?

anishbhagatt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी या पिढीमध्ये का जन्माला आलो नाही… मी याच कारणामुळे इन्स्टापासून दूर होतो. आता घरी सर्व ठिक आहे. तुम्ही तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप गोड नातं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मी भावूक झाले.” अनेक युजर्सनी व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.