वयाच्या ६२ व्या वर्षी एका आजीने सर्वोच्च शिखर सर केल्याचे जर तुम्हाला सांगण्यात आलं तर ते खरं असेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही. खरं तर, हे एक वय आहे ज्यामध्ये लोक सर्व कामातून वेळ काढून विश्रांती घेतात. पण बंगळुरूच्या एका सुपर आजीने हे सिद्ध केले आहे की कोणतेही काम अवघड नसते आणि त्यांनी या वयात साडी नेसून पश्चिम घाटातील सर्वात कठीण शिखर सर केलं आहे.

असं म्हणतात की माणसात जर जिद्द असेल तर म्हातारपणही त्याला थांबवू शकत नाही. खरं तर, जर तुम्हाला वाटत असेल की वृद्धत्वामुळे शरीराची हालचाल कमी होते, तर ते अजिबात नाही कारण बेंगळुरूच्या ६२ वर्षीय नागरत्नम्मा यांनी ते चुकीचे सिद्ध केले आहे. नगररत्नम्‍मा यांनी पश्चिम घाटातील सर्वात कठीण शिखरांपैकी एक शिखर सर केले आहे आणि त्यांचा हा व्हिडीओ केवळ अविश्वसनीयच नाही तर सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Reason behind keeping name of bungalow asshare marketchi krupa in badlapur photo goes viral
आई-वडिलांची नाही तर ‘या’ गोष्टीची कृपा म्हणत पठ्ठ्यानं घराला दिलं भन्नाट नाव; PHOTO एकदा पाहाच
'Sheer Stupidity': Elderly Man Tries Stopping Automated Doors Of Mumbai AC Local With Bare Hands
VIDEO: काय गरज होती का? एसी लोकलचे दरवाजे बंद होताना वृद्ध व्यक्तीनं चढण्याचा प्रयत्न केला अन्…शेवटी काय घडलं पाहा

(हे ही वाचा: ‘या’ व्हायरल फोटोत दडलेला आकडा तुम्ही सांगू शकता का? ९९ टक्के लोक ठरले अपयशी)

कोण आहेत या आजी?

व्हायरल व्हिडीओमध्ये पश्चिम घाटातील शिखर सर करणाऱ्या आजीचे नाव नगररत्नम्मा असून त्या मूळच्या बंगळुरूच्या आहेत. बंगळुरू येथील ६२ वर्षीय रहिवासी नागरथनम्मा हे सिद्ध केले की वय फक्त एक संख्या आहे. त्याने १६ फेब्रुवारी रोजी तिरुवनंतपुरममधील केरळ अगस्त्यरकूडमचे दुसरे सर्वोच्च शिखर सर केले आहे जे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

व्हिडीओ व्हायरल

६२ वर्षीय सुपर डॅडी ट्रेकिंगचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याचे कौतुक होत आहे आणि सर्वजण त्यांना सलाम करत आहेत. व्हायरल झालेला व्हिडीओ विष्णू नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामच्या हायकिंग अकाउंटवरून शेअर केला आहे. पारंपारिक साडी परिधान करून, या व्हिडीओमध्ये, नागरथनम्मा सह्याद्रीच्या पर्वतराजीतील सर्वात उंच आणि सर्वात कठीण शिखरावर सहजतेने ट्रेकिंग करताना दिसतात. हा व्हिडीओ दोरीवर चढल्यानंतर तिचा आनंद आणि उत्साह देखील दाखवतो.

(हे ही वाचा: तुफान वादळात लँडिंग करताना कॉकपिटमधलं थरारक दृश्य दाखवणारा Video Viral)

(हे ही वाचा: Happy Twosday 22/2/2022: आजची तारीख आहे खास; जाणून घ्या कारण)

गिर्यारोहण करणे खरोखर फिट लोकाचं काम आहे आणि या वयात ते करू शकणे हे खरोखरच हे एक आश्चर्य आहे. लोक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले तरी अशा उंच टेकड्या चढणे त्यांच्यासाठी फार कठीण आहे. पण नागरथनम्मा यांनी हे करून दाखवलं आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शननुसार, १६ फेब्रुवारीला त्या आणि तिचा मुलगा आणि त्याच्या मित्रांसोबत रोप क्लाइंबिंग करायला गेल्या होत्या. ही त्यांची पहिली भेट होती. खरे तर लग्नानंतर त्या गेल्या ४० वर्षे व्यस्त होत्या, कारण त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. आता त्यांची मुलं मोठी झाली आहेत आणि व्यवस्थित स्थायिक झाली आहेत, मग त्या आता त्यांची स्वप्नं पूर्ण करत आहे.