सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो. एखादा व्हिडिओ नेटकऱ्यांना भावला तर तो व्हिडिओ डोक्यावर घेतला जातो. व्हिडिओ इतका व्हायरल होतो की, एका रात्रीत एखाद्या व्यक्तीला स्टारडम मिळतो. त्यामुळे काही जणांचा प्रयत्न असतो की, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टार व्हावं. पण काही जण फक्त मस्ती म्हणून एखादा व्हिडिओ टाकतात आणि रातोरात स्टार होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्डी संधूच्या बिजली बिजली गाण्यावर एका ६३ वर्षीय आजीने डान्स केला. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
आजीच्या डान्सिंग मूव्ह्ससोबतच तिची एनर्जी लेव्हल पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल क्लिपमध्ये देसी दादी हार्डी संधूच्या ट्रेंडिंग गाण्यावर नाचताना दिसत आहे. गाण्याच्या सुरात डोलणाऱ्या आजीच्या चेहऱ्यावर दिसणारे मनमोहक हास्य सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वीही रवी बाला यांच्या डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अक्षय कुमार आणि सारा अली खान यांच्या आगामी ‘अतरंगी रे’ या चित्रपटातील ‘चका चक’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. सारा अली खानसारख्याच स्टेप डान्स व्हिडिओत करताना दिसल्या होत्या. नृत्यादरम्यान त्यांचे चेहऱ्यावरील हावभावाची पूर्ण काळजी घेतात.
सोशल मीडियावर या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर १० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. रवी बालाचा परफॉर्मन्स पाहून सोशल मीडियावर यूजर्स त्यांना रिअल लाईफ सिंड्रेला म्हणत आहेत.