नेपाळमधील चितवन परिसरात भूस्खलनानंतर दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्याने सात भारतीय नागरिकांसह किमान ६५ लोक बेपत्ता असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, काठमांडूहून निघालेली एंजल बस आणि गौरकडे जाणारी गणपती डिलक्स बसचा शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास अपघात झाला. नारायणघाट-मुगलिंग रस्त्यालगत सिमलताल परिसरात दरड कोसळल्याने प्रवाशांसह दोन्ही बस नदीत वाहून गेल्या.

मायरिपब्लिका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता प्रवाशांमध्ये सात भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
accident on Palm Beach Road, navi mumbai
पाम बीच मार्गावरील अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी

हेही वाचा – पुणेकरांनी हद्दच केली राव! “गुपचूप बस तिथं” म्हणत थेट बिबट्यालाच दरडावले, महावितरण कार्यालयातील Video Viral

एंजेल बसमध्ये २४ तर गणपती डिलक्समध्ये ४१ जण होते, असे पोलिसांनी सांगितले. गौरकडे जाणाऱ्या बसमधील तीन प्रवासी वाहनातून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले, असे अहवालात म्हटले आहे.

चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी सांगितले की, “बचावकार्य सुरू असून, भूस्खलनाचा ढिगारा हटवला जात आहे. बचावकार्यासाठी पोलीस आणि सशस्त्र दलही सहभागी झाले आहेत.”

हेही वाचा –२०२५ मध्ये युरोपमध्ये येणार मोठे संकट! बाबा वेंगाचे ‘हे’ भाकितं ठरणार का खरे? येत्या वर्षांची भविष्यवाणी ऐकून उडेल थरकाप

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ म्हणाले की, “त्यांनी तातडीने शोध आणि बचाव कार्यासाठी निर्देश जारी केले आहेत. “देशभरात नुकत्याच आलेल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचा नाश झाला आणि भूस्खलनात प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले हे ऐकून मला खूप वाईट वाटले.

नारायणगड-मुग्लिन मार्गावर भूस्खलनात बस वाहून गेल्याच्या दु:खद घटनेने मला खूप वाईट वाटले. मी स्थानिक प्रशासनासह सरकारच्या सर्व एजन्सींना प्रवाशांचा शोध आणि प्रभावीपणे सुटका करण्याचे निर्देश दिले आहे” असे प्रचंड यांनी X वर पोस्ट शेअर करून सांगितले.

हेही वाचा –Video : तब्बल ९ महिने बर्फाखाली अडकलेल्या ३ सैनिकांचे मृतदेह अखेर लष्कराने काढले बाहेर

देशाच्या विविध भागात पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.