फ्रेडी हा आता जगातील सगळ्यात मोठा श्वान म्हणून ओळखला जाणार आहे. कारण ग्रेट डेन प्रजातीच्या या कुत्र्याच्या नावावर आता जगातील सर्वाधिक उंच आणि मोठा कुत्रा असल्याचा विश्वविक्रम जमा झाला आहे. लंडनमधील ४१ वर्षीय मॉडेल स्टोनमन हिच्याकडे असणा-या या ग्रेट डेनचे नाव गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी झाले आहे. या कुत्र्याची उंची ७ फूट ६ इंच एवढी आहे. आतापर्यंत पाहिला गेलेला हा सर्वाधिक उंच कुत्रा आहे. ९२ किलो वजन असलेल्या या कुत्र्याच्या फक्त देखभालीसाठी स्टोनमन यांना वर्षाला दहा लाख रुपये खर्च येतो.
वाचा : फक्त सुंदर तरुणींना नोकरी देणार, उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचे नवे धोरण
रोस्ट चिकन आणि पीनट बटर हे फ्रेडीचे सर्वात आवडते खाद्य आहे. स्टोनमन या घरात एकट्याच राहातात आणि आपला एकाटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी प्राणी पाळले होते. फ्रेडी देखील खूप वर्षांपासून त्यांच्यासोबत राहतो. फ्रेडी आपल्याला मुलासारखाच आहे असेही स्टोनमने सांगितले. फ्रेडीच्या उंचीमुळे त्याचे नाव गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाले आहे.