मराठीत गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं, त्याचं कारण म्हणजे माणसाला एखाद्या गोष्टीची गरज काहीतरी नवीन शोध घ्यायला भाग पाडते. शिवाय अनेक लोक गरजेसाठी नवनवीन शोध लावत असतात, ज्याला आपण देशी जुगाड असं म्हणतो. आपल्या देशात असे जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आपण सोशल मीडियावर अनेक लोकांनी केलेल्या विविध जुगाडाचे व्हिडिओ पाहत असतो. ते व्हिडीओ अनेकदा आपणाला थक्क करणारे असतात. शिवाय या जुगाडाची दखल मोठमोठ्या उद्योगपतींनी घेतल्याचंही आपण अनेकदा पाहिलं आहे.

सध्या अशाच एका अप्रतिम देशी जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जुगाडाची भुरळ प्रसिद्ध उद्योगपती RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनाही पडल्याचं दिसत आहे. हो कारण व्हायरल होत असलेल्या जुगाडाचा व्हिडीओ त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सात सीटरच्या बाईकवर सात तरुण बसल्याचं दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ही मुलं बसलेल्या बाईकवरु सोलार पॅनल लावल्याचं दिसत आहे. ही बाईक बघुन अनेकांनी ती बनवणाऱ्या मुलांचं कौतुक केलं आहे.

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

हेही पाहा- “तो आता जिवंत…” भररस्त्यात बायकोने नवऱ्याला मुलीबरोबर नाचताना पाहिलं अन्…, Video पाहून पोट धरुन हसाल

हेही पाहा- Video: “वय केवळ आकडा…” सायकलच्या सीटवर नव्हे तर चक्क हँडलवर बसून आजोबांनी केला भन्नाट स्टंट

आपल्या देशातील अनेक उद्योगपती तरुणांनी तयार केलेल्या भन्नाट आणि अनोख्या जुगाडाची दखल घेत असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सोलार पॅनेलवर चालणाऱ्या बाईकची दखल हर्ष गोयंका यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कारण गोयंका यांनी आपल्या @hvgoenka नावाच्या ट्टिटर अकाऊंटवरून या बाईकचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ७७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ३ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “उत्पादनात इतके टिकाऊ, भंगारापासून बनवलेले, ७ सीटर वाहन, सूर्यापासून ऊर्जा घेते आणि सावलीही देते. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी आम्हाला आमच्या भारताचा अभिमान आहे.” व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, भंगारापासून बनवलेल्या ७ सीटर वाहनापेक्षा याची डिझाईन अप्रतिम आहे, जी सोलार पॅनेलसह सावली देण्याचे काम करत आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने गरज ही शोधाची जननी असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकजण ७ सीटर वाहन बनविणाऱ्या मुलाचे कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader