Viral video: पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा माणसांच्या जास्त जवळ असतो. कुत्रा माणसाप्रमाणेच मालकाला जीव लावतो त्यामुळे अनेक जणांचं कुत्र्यावर जास्त प्रेम असतं.आपल्या सभोवताली आपल्या प्राण्यांवर प्रेम करणारे आणि प्राण्यांना त्रास देणारे अशा दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. कुत्रा हा सर्वात जास्त पाळला जाणारा प्राणी आहे. काही जण कुत्र्यांना अगदी जीवाप्रमाणे जपतात, आपल्या कुटुंबीयांप्रमाणे त्यांना प्रेम देतात आणि सांभाळ करतात. तर, काही जण मात्र याउलट असतात. ते रस्त्याने जात असतानाही विनाकारण कुत्र्यांना त्रास देतात. मुक्या प्राण्यांना अमानुषपणे वागणूक दिल्याचे गेल्या काही दिवसांत प्रमाण वाढत आहे.
त्यानंतर आता संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीतून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका सोसायटीत एका लहान मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला इंच इमारतीतून खाली फेकले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे प्रकरण नोएडा एक्स्टेंशनमध्ये असलेल्या गौर सिटीच्या १४ व्या एव्हेन्यूधले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सुमारे ७ वर्षांच्या एका मुलाने बागेच्या परिसरातून कुत्र्याचं एक पिल्लू उचलंल आणि त्याला घेऊन तो तळघर पार्किंगकडे जातो. यावेळी हे पिल्लू खूप ओरडत आहे मात्र या मुलानं पुढच्याच क्षणी या पिल्लाला खाली फेकलं आणि तिथून पळून गेला.
घटनेमुळे सोसायटीत राहणारे श्वानप्रेमी संतप्त
दरम्यान, मुलाने पिल्लाला तळघरात फेकले. यावेळी एक तरुण आणि एक महिलाही पाहत होती. मात्र तरीही पिल्लाला वाचवण्याची तसदी कोणी घेतली नाही. सोसायटीतील रहिवासी संदीप तिवारी यांनी फोनवर सांगितले की, ज्या बालकाने पिल्लाला तळघरात फेकले तो मानसिकरित्या आजारी आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> गरीबी सर्व काही शिकवते! आजोबांनी दिला जीवन जगण्याचा मंत्र; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
मात्र, मुलाच्या कुटुंबियांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे या घटनेमुळे सोसायटीत राहणारे श्वानप्रेमी प्रचंड संतापले आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय. अनेकांनी तो रिट्विटही केला आहे.