कोणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही असं म्हणतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीची जोरदार चर्चा सुरु आहे जी क्षणात लखपती बनली आहे. खरं तर सोशल मीडियावर आपण अशा अनेक बातम्या वाचत असतो, ज्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांचे नशीब पालटून जाते. नुकतेच अमेरिकेतील एक मुलगी लखपती बनली असून ती लखपती बनायला तिचा वाढदिवस कारणीभूत ठरला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, आर्कान्सा येथील क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कमध्ये एक ७ वर्षाची मुलगी वाढदिवसानिमित्त फिरायला आली होती. यावेळी तिला या पार्कमध्ये २.९५ कॅरेटचा हिरा सापडला. आर्कान्सा स्टेट पार्क्सच्या म्हणण्यानुसार, पॅरागोल्ड रहिवासी अस्पेन ब्राउन तिच्या कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा करताना पार्कमध्ये हिरा सापडला. पार्कने इन्स्टाग्रामवर मुलीला सापडलेल्या हिऱ्याबद्दल सांगितलं आहे, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “पॅरागोल्ड येथी राहणाऱ्या ७ वर्षीय अस्पेन ब्राउन १ सप्टेंबर रोजी मर्फिस्बोरो येथील डायमंड्स स्टेट पार्कच्या क्रेटरवर आली आणि २.९५ कॅरेटचा हिरा घेऊन निघून गेली. या वर्षी उद्यानात आलेल्या व्यक्तीला सापडलेला हा दुसरा मोठा हिरा आहे. यापूर्वी मार्चमध्ये ३.२९ कॅरेटचा तपकिरी हिरा सापडला होता.”

Jemimah Rodrigues Father Ivan issues clarification after Khar Gymkhana cancels membership
Jemimah Rodrigues : आम्ही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले पण धर्मांतर वगैरे काहीही नव्हतं, जेमिमाच्या वडिलांचं स्पष्टीकरण
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा
13 year old girl stands again despite being paralyzed from waist down due to rare disease
दुर्मीळ आजारामुळे कंबरेपासून खालचा भाग निकामी होऊनही १३ वर्षीय मुलगी पुन्हा उभी राहिली!
AIIMS student rents room for Rs 15
एका खोलीचं महिन्याचं भाडं फक्त एका वडा पाव एवढंच; कुणालाच बसत नाहीये विश्वास, फोटो बघाल तर म्हणालं असं घर हवं
Ratan Tata Death News in Marathi
Ratan Tata : “मग कुत्रे कुठे जातील?”, बॉम्बे हाऊसच्या नुतनीकरणावेळी रतन टाटांना चिंता; एन. चंद्रशेखर यांनी शेअर केली जिव्हाळ्याची आठवण!
man dies in kerala hospital after treated by fake doctor
धक्कादायक! १२ वर्षांपासून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करू न शकणाऱ्या बोगस डॉक्टरकडून रुग्णावर उपचार; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Manager Fired HR
मॅनेजरचा CV क्षणार्धात नाकारला, एचआरची नोकरीच गेली; नेमकं काय घडलं वाचा!

हेही पाहा- गोविंदाने दोन एक्के खांद्यावर घेऊन मारल्या २० बैठका; दहीहंडी पथकाचा व्हायरल VIDEO पाहून थक्क व्हाल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

ही पोस्ट इन्स्टाग्रामवर दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली असून ती खूप लाईक केली जात आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने “व्वा, फार सुंदर” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने, “अस्पेनचे अभिनंदन, हा एक उत्तम शोध आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “मी इथे जाण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.” व्हायरल पोस्टबरोबर हिऱ्याचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो खूपच अप्रतिम दिसत आहे. हा दुरून प्लास्टिकसारखा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो खरा हिरा आहे. या पार्कमध्ये लांबून लोक हिरे शोधायला येतात पण प्रत्यक्षात हिरे शोधणारे फार कमी लोक आहेत. तर इथे यापूर्वीही अनेक लोकांना हिरे सापडल्याचंही सांगितलं जात आहे.