पावसाळा सुरु झाल्यापासून अनेक लोक वर्षाविहाराचा आनंद लुटताना दिसत आहे. दरम्यान सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी-नाले आणि धबधब्यांच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाली आहे. असे असताना पर्यटकांना फिरण्याचा मोह आवरता येत नाहीये. लोणवळ्यातील भुशी डॅम आणि ताम्हिणी येथील धबधब्यावरून काहीजण वाहून गेल्याची घटना ताजी असताना पर्यटक स्वत:चा जीव धोक्यात टाकून वर्षाविहाराचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान मुंबईत रविवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरातील विविध भागांना बसला. बेलापूर येथील धबधब्यात अडकलेल्या सुमारे ७० पर्यटकांची रविवारी नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अग्निशमन विभागाने सुटका केली. व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या तलावात अडकलेल्या पर्यटकांना आणि अग्निशमन विभागाकडून दोरीच्या सहाय्याने बाहेर काढताना दिसत आहे.

महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये २१ जुलै रोजी अत्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) मते, मुंबईत रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान बेलापूर येथील धबधब्याला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असताना ही घटना घडली. पावसाळ्यात या ठिकाणी जाणे धोक्याचे असल्याने खारघर व आसपासच्या भागातील धबधबे अधिकाऱ्यांनी बंद केल्याने या परिसरात पर्यटकांची संख्या वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. वाहणाऱ्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने धबधब्याला भेट देणारे पर्यटक अडकले.

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

हेही वाचा – गुपचूप येतात, अंगावर खाज सुटणारी पावडर टाकतात अन् लक्ष विचलित होताच…. खुजली गँगचा Video Viral

अग्निशामक दलाने जीव धोक्यात टाकून केली नागरिकांची सुटका

मुसळधार पाऊस पडत असल्याने आणि पाणी वेगाने वाहत असल्याने अधिकाऱ्यांनी अडकलेल्या पर्यटकांची मोठ्या कष्टाने सुटका केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी त्यांना दोरी आणि इतर उपकरणे वापरावी लागली. अत्यंत भीषण परिस्थितीमुळे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही आपला जीव धोक्यात घातला. दोरीच्या सहाय्याने जोरदार पाण्याचा प्रवाहात उतरून अडकलेल्या पर्यटाकांची सुटका करत आहे.

हेही वाचा- ‘कॉलर पकडली, बुक्या मारल्या…पुणे पोलिसाची PMT बसचालकाला बेदम मारहाण, Video Viral

बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये अडकले २० लोक, मानवी साखळी करून केली सुटका

हेही वाचा – देवासारखी धावून आली महिला डॉक्टर! दिल्ली विमानतळावर अचानक वृद्धाला आला हृदयविकाराचा झटका; वेळीच CPR देऊन वाचवला जीव, Video Viral

दरम्यान शनिवारी देखील अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाणी शिरले ज्यामुळे २० लोक अडकले होते. नाल्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी वन विभागाची मद घ्यावी लागली. पाण्याखाली गेलेला पूल ओलांडण्यासाठी मानवी साखळी करण्यात आली होती. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेत आला होता.