नोकरदार पुरुषांना त्यांचा पगार आणि महिलेला तिचं वय कधीच विचारू नये, असं म्हटलं जातं. महिलेच्या वयाचा प्रश्न उपस्थित झालाच आहे तर, हा फोटोच बघा ना! या फोटोतील महिलेनं तिचं वय सांगितलं तर तिच्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणारच नाही. सध्या सोशल मीडियावर ही महिला आणि तिच्या वयाची खूपच चर्चा सुरू आहे. कारणही तसंच आहे. तिचं वय कोणालाही ओळखता येत नाही. आता हा फोटो पाहून तुम्हीही अंदाज लावायला सुरुवात केली असंल. आता तुम्ही म्हणाल की, ही महिला फार तर चाळीशीतली असेल. कुणी म्हणेल की, नाही हो, हिचं वय ३०-३५ असेल. पण तुम्ही जो अंदाज वर्तवलाय तो साफ चुकीचा आहे बरं का! या महिलेचं वय आहे सत्तर. राव, तुम्हाला तर धक्काच बसला असेल ना? पण हे खरंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी त्याने नाकारली २२ लाखांची नोकरी

तिचं वय सत्तर आहे आणि ती ४ नातवंडांची आजीही आहे. तर या आजींचं नाव आहे कॅरोलीन. ती ऑस्ट्रेलियात राहते. आपल्या आरोग्याची त्यांनी इतकी उत्तम काळजी घेतली आहे की आता तिच्या सौंदर्याचा अनेकींना हेवा वाटला नाही तर नवलंच. सत्तरी गाठलेल्या इतर महिला पाहिल्या तर या वयात आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्या ग्रासलेल्या असतात. पण ही आजी मात्र एकदम ‘फिट आणि फाइन’ आहे. अर्थात एवढं फिट आणि फाइन राहण्यासाठी त्या मेहनतही तेवढीच घेतात. योग्य आहार आणि व्यायाम, खूप चालणं आणि सतत काहीना काही काम करत राहणं हे आपल्या निरोगी आयुष्याचं रहस्य आहे, असं त्या सांगतात. आजही टेनिस कोर्टमध्ये उतरल्या की त्यांचा उत्साह हा भल्याभल्यांना लाजवेल, असाच असतो. वयाची सत्तरी गाठलेल्या अनेक महिलांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्या प्रेरणा देतात.