प्रेमात आणि युद्धा सर्व काही माफ असतं असं म्हटलं जातं. तसेच प्रेम आंधळं असतं त्याला कसलीही बंधनं नसतात हे वाक्यही अनेकदा चित्रपटांपासून ते सोशल मीडियावरही पहायला मिळतं. इतिहासातही अशाप्रकारेचे अनेक दाखले आणि प्रेम प्रकरण पहायला मिळतात त्याचप्रकारे आजही अनेक ठिकाणी अशापद्धतीची लग्न होताना दिसतात. सध्या पाकिस्तानमधील अशाच एका लग्नाची चर्चा जगभरामध्ये आहे. येथे एका १९ वर्षीय मुलीने ७० वर्षांच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युट्यूबवरील सय्यद बसित अलीने त्याच्या चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हे अनोखं प्रेमप्रकरण जगासमोर आलं आहे. पाकिस्तानमधील आगळ्या वेगळ्या प्रेमप्रकरणांची एक मालिकाच हा युट्यूबर त्याच्या चॅनेलवरुन शेअर करत असतो. या सिरीजमुळे त्याला पाकिस्तानबरोबरच जगभरामध्ये प्रसिद्धी मिळत आहे. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पती-पत्नीच्या वयामध्ये ४९ वर्षांचं अंतर असणाऱ्या जोडप्याची प्रेमकथा त्याने सांगितलं आहे. या व्हिडीओतील व्यक्तीचं वय ७० वर्ष असून त्याच्या पत्नीचं वय १९ वर्ष आहे. सध्या पाकिस्तानमध्ये या लग्नाची तुफान चर्चा आहे.

लग्न करण्यासंदर्भातील निर्णयाबद्दल बोलताना या तरुणीने, “ते मनाने फार तरुण आहेत,” असं आपल्या ७० वर्षीय पतीसंदर्भात म्हटलं आहे. या व्यक्तीचं नाव लियाकत अली असून मुलीचं नाव शौमिला अली असं आहे. दोघेही लाहोरमध्ये राहतात. या दोघांची पहिली भेट मॉर्निंग वॉकदरम्यान झाली होती. मात्र या भेटीनंतर मुलीवर प्रभाव पाडण्यासाठी लियाकत तिच्या मागून गाणं गुणगुणत वॉक करायचे. याच गोष्टीमुळे त्यांच्यात संवादाला सुरुवात झाली आणि ती लियाकत यांच्या प्रेमात पडली.

वयातील अंतर ही लग्न करण्यासाठी फार मोठी अडचण आहे असं वाटलं नाही अशी कबुली दोघांनीही दिली. शौमिलाने यासंदर्भात “प्रेमात असताना आपण वयाचा विचार करत नाही. प्रेम अचानक होतं,” असं मत व्यक्त केलं. मात्र शौमिलाच्या पालकांचा या लग्नाला विरोध होता. तरीही शौमिलाचं लियाकत यांच्यावर प्रेम असल्याने अखेर पालकांनी परवानगी दिली. “माझ्या पालकांनी आधी विरोध केला मात्र नंतर मी त्यांचं मन वळवण्यात यशस्वी ठरले,” असं शौमिला सांगते.

लियाकत यांनीही ‘मनाने फार तरुण’ असल्याच्या पत्नीच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं सांगितलं. “प्रेम करण्याचा विषय असतो तेव्हा वय फार महत्त्वाचं नसतं,” असं लियाकत म्हणाले. लियाकत यांनी पत्नी शौमिलाच्या हाताला चव असल्याचं सांगतात. “ती बनवते ते जेवणं एवढं चविष्ट असतं की आपण हॉटेलमध्ये खाणं सोडून दिलं आहे,” असं लियाकत म्हणाले.

वयामध्ये मोठा फरक असलेल्या लोकांनी लग्न करावं की नाही असं विचारलं असता त्यांनी या प्रश्नाला थेट उत्तर दिलं. “तरुण आहोत की म्हतारे हा प्रश्न नाही. कायदेशीर दृष्ट्या जे लग्न करण्यासाठी पात्र आहेत ते त्यांच्या पसंतीनुसार लग्न करु शकतात,” असं लियाकत म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 year old marries 19 year old girl in pakistan scsg