कॅनडिअन मॉडेल आणि ‘इन्स्टाग्राम स्टार’ सोफी ग्रे ही गेल्या महिनाभरापासून इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. एका प्रभावी निर्यणामुळे एकाच वेळी तिने थोडे थोडके नाही तर तब्बल ७० हजारांहून अधिक फॉलोअर्स गमावले.

आपल्या फिटनेस मंत्रा आणि ‘परफेक्ट बॉडी’साठी प्रसिद्ध असलेली सोफी इन्स्टाग्रामवर आपले फोटो अपलोड करायची. फिटनेस, मेकअप, फॅशन टिप्स अशा अनेक टिप्स ती फॉलोअर्सना देते. त्यामुळे सोफीचे थोडे थोडके नाही तर जवळपास साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. सुंदर पेहरावातले, मेकअपमधले फोटो शेअर केल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिला लाखोंनी लाईक्स मिळत होते. फॉलोअर्स तिची वाहवा करत होते. तिची प्रसिद्धी वाढत चालली होती. पण, अचानक सोफीनं एक धीट निर्णय घेतला. यापुढे मी स्वत:चे सुंदर फोटो शेअर करणार नाही असं तिने जाहीर केलं.

भारतीय तरुणाने स्थापन केला ‘किंग्डम ऑफ दीक्षित’ नावाचा देश

‘प्रत्येकाला सुंदर आणि आकर्षक दिसायचं आहे. माझ्याकडे बघूनही अनेकींना तसंच वाटत असेल पण मला यापुढे कोणाच्याही मर्मावर बोट ठेवून त्यांना दु:खी करायचं नाही. आपण जसे आहोत तसेच आपण स्वत:ला स्विकारले पाहिजे. मला यापुढे प्रत्येकामध्ये सकारात्मक उर्जा भरायची आहे. मी स्वत: परिपूर्ण नाही. मी जशी दिसते तशी बिलकूल नाही. मी स्वत:ला जगासमोर खूप चुकीच्या पद्धतीने दर्शवत आले.
मला माझ्या शरीराची लाज का वाटावी? मला का नेहमी सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा थर लावाला लागतो? मी खऱ्या आयुष्यात तशी बिलकुल नाही, मग दिखाव्यासाठी मी तसं जगाला दाखवण्याचा प्रयत्न का करू?’ अशी भावनिक पोस्ट करून तिने यापुढे दिखावा न करण्याचं मान्य केलं. त्यामुळे यापुढे तिचे सुंदर फोटो पाहायला मिळणार नाही अशी मानसिकता असलेल्या थोड्या थोडक्या नाही तर ७० हजार फॉलोअर्सनं तिला अनफॉलो केलं आहे. अर्थात यामुळे सोफीला सोशल मीडियावर मोठा फटका बसला आहे पण तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम आहे.

Video: ‘बाहुबली’प्रमाणे हत्तीच्या सोंडेवरून पाठीवर चढायला गेला आणि…

Story img Loader