कुटुंब हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. आई-वडील, बहिण-भाऊ, आजी-आजोबा ही सर्व फक्त नाती नव्हे तर कुटुंब असते. आनंद असो कि दुख कुटुंब नेहमी आपल्यापाठीशी असते. कुटुंबाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण एक सुंदर आठवण असते जी आयुष्यभर जपून ठेवतो. कुटुंबासह ट्रिपला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सोशल मीडियावर सध्या एका गुजराती कुटुंबाच्या रोड ट्रिपची सर्वत्र चर्चा होत आहे. अहमदाबाद ते लंडन हा १०५०० किमीचा प्रवास हे कुटुंब ७३ दिवसांमध्ये पूर्ण करणार आहे. विशेष म्हणजे ७३ वर्ष जुन्या व्हिटेंज कारमध्ये हे कुटंब रोड ट्रिप करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दमन ठाकुर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. पोस्टनुसार ठाकुर आणि त्यांच्या कुटुंबाने १९५०च्या एमजी वायटी लाल परीमध्ये २.५ महिन्यांमध्ये १६ देशांना भेटी दिल्या. आयुष्यभर लक्षात राहणारा प्रवास त्यांना मर्सिडीजइतका महाग पडला.

या कारचे उत्पादन यूकेच्या अबिंग्डन येथील कारखान्यात करण्यात आले होते आणि शेवटचे ठिकाण लक्षात घेऊन सहलीचे नियोजन केले होते. तिच्यासाठी ही एकप्रकारे घरवापसी होती,” असे ठाकुर यांनी बेटर इंडियाला सांगितले.

आपल्या प्रवासाची माहिती देताना ठाकुर यांनी शेअर केले की,१२ ऑगस्ट रोजी अहमदाबादहून डफल बॅग आणि ८० किलो अन्न घेऊन निघाले होते. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी मुंबई ते दुबई प्रवासासाठी सागरी मार्ग स्वीकारला आणि २८ ऑगस्ट रोजी दुबईला पोहोचले. दुबईहून हे कुटुंब रस्त्याने पुढे जात राहिले आणि २६ ऑक्टोबर रोजी यूकेला पोहोचले.

हेही वाचा – ‘अरे हे काय सुरू आहे पुण्यात!’ जेव्हा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात स्पायडरमॅन उतरतो तेव्हा….. Viral Video पाहून पोटधरून हसाल

११ महिन्यांच्या बारीकसारीक नियोजनानंतर आणि लाल परी तयार करण्यासाठी अंसख्यवेळा गुजरातभोवती टेस्ट ड्राइव्ह केल्यानंतर या साहसी प्रवासासाठी ते तयार झाले.

दमनने सांगितले की,”त्यांच्याकडे आधीच तयार केलेला आंतरराष्ट्रीय परवाना आहे. पण, प्रत्येक नवीन देशाने त्यांच्याकडून स्थानिक रस्त्यावर फिरण्यासाठी कर आणि विमा शुल्क आकारले, परंतु या गोष्टी त्यांच्या फिरण्याचा उत्साह कमी करू शकले नाही.

हेही वाचा – Dunzoचा शर्ट अन् Zeptoची बॅग घेऊन चोरट्यांनी केली चोरी, पुण्याच्या आलिशान सोसायटीतील CCTV Video Viral

ऑक्टोबर २०२३ मध्ये, कुटुंबाने अभिमानाने त्यांचे साहस सोशल मीडियावर शेअर केले, त्यांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्यांच्या लाल परीच्या भारत ते युनायटेड किंगडम प्रवास करण्यासाठी लोकांनी कौतूक केले. विशेष म्हणजे अशा व्हिटेंज कारमध्ये असा अविश्वसनीय प्रवास करणारे पहिले भारतीय ठरले आहेत

सोशल मीडिया प्रतिक्रियांनी गुंजले, कारण वापरकर्त्यांनी त्यांच्या स्वतःच्या साहसांची आठवण करून दिली आणि कुटुंबाच्या धैर्याने आणि धैर्याने आश्चर्यचकित झाले. एकाने म्हटले, “१९७६ मध्ये मी माझ्या पालकांसह लंडन ते श्रीलंकेला गाडी चालवली होती, अधिकाधिक लोकांनी आयुष्यात एकदाच असा आनंद लुटला पाहिजे. दुसरा म्हणाला, “एक लॉरेन्स ऑफ अरेबिया होता. मी आज अहमदाबादच्या ठाकुरला ओळखतो,” तर तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली की, “हे सुंदर आहे”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 73 day road trip in 73 year old vintage car gujarati familys memorable journey goes viral snk
Show comments