8 Year Old Dies After Dog Bite: वाघ बकरी टी समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याने मृत्यू झाल्यानंतर आता देशभरातून अनेक ठिकाणहून भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांचे प्रकार समोर येत आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने आठ वर्षांच्या मुलीचा दोन आठवड्यांनी मृत्यू झाला असल्याचे वृत्त पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. मृत चिमुकलीच्या आईने उपचारासाठी रेबीज प्रतिबंधक लसीऐवजी घरगुती उपचार वापरले असल्याने हा मृत्यू ओढवला असे समजतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुत्रा चावल्यावर डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं का?

सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC), ब्लॉकचे प्रमुख डॉ जितेंद्र वर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, की कुटुंब उपचारासाठी केंद्रात आले होते आणि त्यांना एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. मात्र, त्यांनी त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. मुलीला १०-१५ दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावला होता. तिने या घटनेची माहिती तिच्या आईला दिली होती, तिने तिच्यावर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय केले. मृत चिमुकली व कुटुंब हे बह ब्लॉकच्या चौसांगी गावातील रहिवासी असून तिचे वडील मजूर आहेत आई गृहिणी आहे.

हे ही वाचा<< ‘वाघ बकरी टी’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे ४९व्या वर्षी निधन; भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला

रेबीजचे डोस कधी घ्यावे लागतात? लक्षणे काय?

डॉक्टरांनी सांगितले की २४ तासांच्या आत रेबीज प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, तिसऱ्या दिवशी दुसरा डोस, सातव्या दिवशी तिसरा डोस आणि शेवटचा डोस २८ व्या दिवशी द्यावा लागतो. अन्यथा रेबीजची लागण होण्याचा व मृत्यूचा सुद्धा धोका उद्भवतो.रेबीजची काही स्पष्ट लक्षणे म्हणजे हायड्रोफोबिया (पाण्याची भीती), मान दुखणे आणि उलट्या होणे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 year old girl dies after dog bites mother tried using home remedies ignoring doctor advice of rabies signs and treatment svs
Show comments